मोहोर करपला, आंब्यावर संकट

मोहोर करपला, आंब्यावर संकट

Published on

-rat२७p८.jpg-
OP२६O२७५२५
मंडणड ः पणदेरी येथील आंबा कलमांवरील करपलेला मोहोर.
-rat२७p९.jpg- मंडणगड ः
२६O२७५२६
पणदेरी येथील करपलेल्या मोहोराची पाहणी करताना कृषी विद्यापिठाचे शास्त्रज्ज्ञ आर. एस. मुळे, एन. व्ही. दळवी, तालुका कृषी अधिकारी सोमनाथ अहिरकर आणि शेतकरी.
---------
मोहोर करपल्याने आंबा बागायतदार संकटात
मंडणगडमधील हंगामावर परिणाम; उत्पादनात मोठी घट, विशेष मदतीची मागणी
सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. २७ ः मंडणगड तालुक्यातील सर्व गावांतील आंबा बागायतदार शेतकरी सध्या गंभीर आर्थिक संकटाला सामोरे जात आहेत. सलग दोन वर्षे निसर्गाच्या अवकृपेने आंबा उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. आंबा हा तालुक्यातील हजारो कुटुंबांच्या उपजीविकेचा मुख्य आधार असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
गेल्या वर्षी मे महिन्याच्या ५ तारखेपासून सुरू झालेल्या पावसामुळे विक्रीसाठी तयार असलेला आंबा पावसात भिजून खराब झाला. वर्षभराची मेहनत आणि झालेला खर्च एका पावसात वाहून गेल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला. यंदा परिस्थिती आणखी गंभीर बनली आहे. हवामानातील बदल, वाढलेले तापमान आणि प्रतिकूल वातावरणामुळे आंब्याचा मोहोर मोठ्या प्रमाणात करपला आहे. मंडणगड तालुक्यात ९० टक्क्यांहून अधिक उत्पादन घटल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. अनेक बागांमध्ये फळधारणा जवळपास शून्यावर आली आहे. या परिस्थितीची दापोली कृषी विद्यापिठाचे शास्त्रज्ज्ञ आर. एस. मुळे, एन.व्ही. दळवी व त्यांच्या सहकाऱ्यांनी तसेच तालुका कृषी अधिकारी सोमनाथ अहिरकर, कृषी सहाय्यक यांनी प्रत्यक्ष पाहणी करून गंभीर दखल घेतली आहे; मात्र अद्याप शासनाकडून कोणतीही ठोस नुकसान भरपाई किंवा विशेष आर्थिक मदत जाहीर झालेली नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. सलग दोन वर्षे उत्पन्न न मिळाल्याने शेतकऱ्यांचा संपूर्ण खर्च वाया गेला असून कर्जफेड, घरखर्च आणि पुढील हंगामासाठी बागांचे संगोपन करणे कठीण झाले आहे. अनेक कुटुंबे आर्थिक व मानसिक तणावाखाली असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
---
कोट
मंडणगड तालुक्यातील सर्व आंबा बागायतदारांनी एकत्र येत शासनाकडे तातडीने विशेष आर्थिक मदत जाहीर करावी, कोकणासाठी स्वतंत्र आपत्ती पॅकेज मंजूर करावे, पुढील हंगामासाठी औषधे व निविष्ठांवर जास्तीत जास्त अनुदान द्यावे. तसेच आंबापिकाचा प्रभावीपणे पीकविमा योजनांमध्ये समावेश करावा, अशा प्रमुख मागण्या आहेत. हा प्रश्न केवळ उत्पन्नाचा नसून, शेतकऱ्यांच्या अस्तित्वाचा आहे. शासनाने तातडीने न्याय द्यावा.
-जमीर माखजनकर, सचिव, जिल्हा काँग्रेस कमिटी
--
कोट
मंडणगड तालुक्यातील शेनाळे, सोवेली, पंदेरी, पेवे, गोकुळगाव व बाणकोट या गावांमध्ये दापोली कृषी विद्यापिठाचे शास्त्रज्ज्ञ व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी बागायतदारांसमवेत प्रत्यक्ष पाहणी करून सविस्तर अहवाल जिल्हा प्रशासनाकडे सादर केला आहे. गतवर्षी लांबलेला पाऊस, दीड महिना अधिक टिकलेला थंडीचा कालावधी तसेच झाडांवर आलेला तीन प्रकारचा मोहोर यांसारख्या विविध कारणांमुळे सध्याची परिस्थिती निर्माण झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष समोर आला आहे. याबाबत अधिक अभ्यास सुरू आहे. मंडणगड तालुक्यात सुमारे चार हजार हेक्टर क्षेत्रावर आंबा लागवड आहे.
--सोमनाथ अहिरकर, तालुका कृषी अधिकारी, मंडणगड
----
-rat२७p१०.jpg-
P२६O२७५२२
राजापूर ः प्रतिकूल हवामानामुळे काळवंडलेला मोहोर.
-----------
शासनदरबारी केवळ चर्चाच ः गुडेकर
राजापूर ः यावर्षी हंगामाच्या सुरुवातीपासूनच्या प्रतिकूल हवामानाचा फटका बसून हापूस आंबा-काजूचे उत्पादन घटले आहे. सद्यःस्थितीतील उत्पादन पाहता त्यासाठी केलेला खर्चही भागवणे आणि त्यासाठी बँकांकडून घेतलेल्या कर्जाचे हप्ते फेडणे मुश्कील झाल्याने बागायतदारांची पुरती आर्थिक कोंडी झाली आहे. हापूस आंबा-काजूच्या झालेल्या नुकसानीची शासनदरबारी चर्चा होत असली तरी नुकसानीचे अद्यापही सर्व्हेक्षण झालेले नाही. त्याबाबत कोकण विकास आघाडीचे राजापूर संघटक सुरेश गुडेकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
प्रतिकूल हवामानाचा फटका बसून आंबा-काजूच्या झालेल्या नुकसानीचे प्रत्यक्ष बागांना भेटी देऊन कृषी विभागाकडून तत्काळ सर्व्हेक्षण व्हावे आणि प्रतिहेक्टरी किमान तीन लाख रुपये शासनाकडून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी कोकण विकास आघाडीचे राजापूर संघटक गुडेकर यांनी केली आहे. यावर्षी हापूस आंबा-काजू हंगामाचे सुरुवातीपासून सातत्याने प्रतिकूल वातावरण राहिले. लांबलेला पाऊस, दाट धुके आदींमुळे कलमांना आलेला मोहोर काळा पडून गळून गेला. मोहोर टिकून फळधारणा व्हावी यासाठी शेतकऱ्यांनी सातत्याने औषध फवारणी केली; मात्र, त्यानंतरही मोहोर टिकून फळधारणा झालेली नाही. तुडतुडा, बुरशीचा प्रादुर्भावही मोठ्या प्रमाणात झाला आहे. सद्यःस्थितीमध्ये हापूस आंब्याचे वीस त पंचवीस टक्के उत्पादन आले आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com