अॅलिसियाला पडली कोकणाची भुरळ

अॅलिसियाला पडली कोकणाची भुरळ

Published on

rat२७p१२.jpg-
P२६O२७५२४
रत्नागिरी : लक्ष्मीचौक येथून जर्मनीची धावपटू अॅलिसिया हिने पुढील प्रवासाला प्रारंभ केला. त्या प्रसंगी सोबत कोकण कोस्टल टीम आणि रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचे सदस्य.
-------
‘अॅलिसिया’ची महिला सक्षमीकरणासाठी धाव
जर्मनच्या धावपटूला कोकणाची भुरळ ; शालेय विद्यार्थ्यांबरोबर साधला संवाद, आदरातिथ्याने भारावली
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २७ : जर्मनीची धावपटू अ‍ॅलिसिया सध्या महिलांच्या सक्षमीकरणाच्या ध्येयाने मुंबई ते गोवा असा धावण्याचा अनोखा प्रवास करत आहे. दररोज सुमारे ४० किलोमीटर अंतर पार करत ती विविध ठिकाणी भेटी देत असून, स्थानिक शाळांना भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधत आहे. महिला आणि मुलांना क्रीडा स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी प्रेरित करणे, हा तिच्या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. आज ती लक्ष्मीचौक येथून आडिवरेच्या दिशेने रवाना झाली. त्या प्रसंगी कोकण कोस्टल टीम व रत्नागिरी सायकलिस्ट क्लबच्या आदरातिथ्याने ती भारावून गेली.
आज मराठी राजभाषा दिनी, लक्ष्मीचौक येथे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करून आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय, भारतमाता की जय अशा घोषणा देत धावण्यास सुरवात केली. रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचे अध्यक्ष महेश सावंत, सुवर्णसूर्य फाउंडेशनचे संचालक प्रसाद देवस्थळी, कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉन टीमचे उज्ज्वल बापट, अभिषेक करवडे, विवेक आणि रेणुका खानविलकर, इरा सावंत, मानसी व सचिन मराठे, रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचे नीलेश शाह, ज्ञानेश्वर पांडे, मकरंद पटवर्धन आदींनी तिला भाट्ये येथील झरीविनायक मंदिरापर्यंत साथ दिली. त्यानंतर अथर्व देवस्थळी आणि विनायक पावसकरने तिला पावसपर्यंत साथ दिली.
हेदवीतील दीपक जोगळेकर यांनी तिला जयगडपर्यंत मार्गदर्शन केले. हेदवी येथे त्यांच्या घरी तिने कोकणी आदरातिथ्याचा मनमुराद आनंद घेतला. दापोलीचे अंबरीश गुरव यांचे देखील मोलाचे सहकार्य तिला मिळते आहे. दोन दिवसांपूर्वी तिने जयगड ते गणपतीपुळे या प्रवासात रत्नागिरी सायकलिस्ट क्लब व कोकण कोस्टल टीमचे अथर्व शेंड्ये आणि प्रसन्न यांनी साथ दिली. गणपतीपुळे ते रत्नागिरीदरम्यान धावताना तिला हा मार्ग ‘गणपतीपुळे अल्ट्रा’चा असल्याचे समजले. या निमित्ताने तिने सर्व धावपटूंना कोकणात येऊन या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन केले. तसेच महर्षी कर्वे स्त्री शिक्षणसंस्थेच्या शिरगाव येथील बीसीए कॉलेजच्या विद्यार्थिनींशी तिने संवाद साधला.
------
चौकट
संस्कृती, माणुसकी, खेळाडूवृत्तीने प्रभावित
रत्नागिरीत पोहोचल्यानंतर अॅलिसियाने कोकम करी रेस्टॉरंटतर्फे आयोजित पारंपरिक पाककला स्पर्धेत सहभागी झालेल्या ७५ महिलांचे विशेष कौतुक केले आणि त्यांना प्रोत्साहन दिले. नंतर तिने मांडवी समुद्रकिनाऱ्याला भेट दिली. स्नेहल भिसे यांच्या पलाश ब्लूम डे केअरमध्ये लहान मुलांशी संवाद साधला. त्यानंतर कोकण कोस्टल टीम आणि रत्नागिरी सायकलिस्ट क्लब यांच्यासोबत तिने स्नेहभोजनाचा आनंद घेतला. या संपूर्ण प्रवासात कोकणातील खिलाडूवृत्ती, संस्कृती, माणुसकी आणि पाहून ती विशेष प्रभावित झाली.
----------
कोट
कोकणातील लोकांचे सहकार्य, प्रेमळ स्वभाव आणि सकारात्मक दृष्टिकोन पाहून मी भारावून गेले आहे. मी पुन्हा पुन्हा कोकणात येईन. येथे काहीतरी मोठं आणि सकारात्मक घडत आहे.
--अॅलिसिया, जर्मनीची धावपटू

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com