बांदा सोसायटीच्या कर्जदार
सभासदांनो, केवायसी करा

बांदा सोसायटीच्या कर्जदार सभासदांनो, केवायसी करा

Published on

27530

बांदा सोसायटीच्या कर्जदार
सभासदांनो, केवायसी करा

राजाराम सावंत; कार्यालयात नोंदणी सुरू

सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. २७ ः बांदा विकास सोसायटीच्या सर्व कर्जदार सभासदांनी तत्काळ आपली केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन सोसायटीचे अध्यक्ष राजाराम उर्फ बाळू सावंत यांनी केले आहे. शासनाच्या निर्देशानुसार ही प्रक्रिया अनिवार्य केली असून संबंधित सभासदांनी आवश्यक कागदपत्रांसह सोसायटी कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही आवाहन त्यांनी केले.
सहकार आयुक्तांनी सहकारी संस्थांमधील व्यवहार अधिक पारदर्शक व सुरक्षित करण्याच्या उद्देशाने केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार सर्व कर्जदार सभासदांची माहिती अद्ययावत करणे आवश्यक असल्याने ही मोहीम राबविण्यात येत आहे. केवायसीसाठी सभासदांनी आधार कार्ड, बँक पासबुक (संबंधित बँक खाते तपशील), आधार लिंक असलेला मोबाईल क्रमांक सादर करणे आवश्यक आहे. सर्व सभासदांनी विलंब न करता लवकरात लवकर केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी, अन्यथा भविष्यातील आर्थिक व्यवहारांमध्ये अडचणी निर्माण होऊ शकतात, असा इशाराही सावंत यांनी दिला आहे. सोसायटी कार्यालयात केवायसी नोंदणी सुरू असून सभासदांनी सहकार्य करावे व अधिक माहितीसाठी सचिव मयुरी परब यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन व्यवस्थापन समितीने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com