कलगीतुरा शाळा

कलगीतुरा शाळा

Published on

‘कलगीतुरा’ ही जनसंवादाची शाळा
सचिन माळी ः मराठी भाषा गौरव दिन
सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. २८ पूर्वी शाळा नसतानाही लोकांना धर्म, नीती, इतिहास शिकवण्याचे काम कलगीतुरा लोककलेने केले. लोकशाही संवादाचे उदाहरण असणारी ही कला म्हणजे ग्रामीण समाजात बौद्धिक परंपरा, नैतिक मुल्ये, धर्म, समाज प्रबोधन, अंधश्रद्धा, सामाजिक प्रश्नांवर भाष्य, सामूहिक ऐक्य निर्माण करणारी जनसंवादाची शाळा होती, असे प्रतिपादन गीतकार सचिन माळी यांनी मंडणगड येथे केले. लोकनेते गोपीनाथ मुंडे महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिनानिमित्ताने कोकणातील कलगीतुरा शाहिरी परंपरा या विषयावर व्याख्यान देताना ते बोलत होते. या वेळी प्राचार्य वाल्मीकी परहर, उपप्राचार्य डॉ. विष्णू जायभाये, मराठी विभागप्रमुख प्रा. संजीवकुमार इंगोले, प्रा. महादेव वाघ, डॉ. महेश कुलकर्णी, ग्रंथपाल दगडू जगताप आदी उपस्थित होते.
---
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com