स्वच्छता मोहीम

स्वच्छता मोहीम

Published on

धर्माधिकारी प्रतिष्ठानची
स्वच्छता अभियान
गुहागर ः डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे १ मार्चला गुहागर शहरात स्वच्छता अभियान राबवण्यात येणार आहे. अभियानात सकाळी ८ ते दुपारी १२ वाजेपर्यंत स्वच्छता केली जाणार आहे. गुहागर न्यायालय ते बाजारपेठ, श्री व्याघ्रंबरी देवस्थान वरचापाट ते महावितरण कार्यालय, सर्व शासकीय कार्यालयात हे अभियान राबवण्यात येणार आहे. तालुक्यातील श्री सदस्य स्वच्छतामोहिमेसाठी उपस्थित राहणार आहेत.

वेळणेश्वर महाविद्यालयात
मराठी भाषा गौरव दिन
गुहागर ः वेळणेश्वर येथील महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालय येथील मध्यवर्ती ग्रंथालय विभागातर्फे कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला विद्या प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ. विजय बेडेकर, संस्थेचे सदस्य जयंत कयाल, भाभा अणुसंशोधन केंद्र येथील माजी अभियंता व ग्रंथ अनुवादक नरेंद्र गोळे, प्राचार्य डॉ. अविनाश पवार आदी उपस्थित होते. या प्रसंगी नरेंद्र गोळे यांनी मराठी भाषेत तांत्रिक शब्दांचा वापर या विषयावर मार्गदर्शन केले. दैनंदिन व्यवहारात आपण सर्रास इंग्रजी शब्दांचा वापर करतो; मात्र त्या शब्दांना समर्थ मराठी प्रतिशब्द उपलब्ध असतात, याकडे त्यांनी लक्ष वेधले. त्यांनी स्वतः संशोधनपूर्वक अनेक मराठी प्रतिशब्द शोधून काढले असून, ते आपल्या ३६ अनुवादित ग्रंथांमधून वापरात आणले आहेत तसेच हे प्रतिशब्द आपल्या संकेतस्थळावरील ब्लॉगद्वारे सर्वांसाठी उपलब्ध करून दिले असल्याचे त्यांनी नमूद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com