कोकण
-क्राईम
सार्वजनिक ठिकाणी
मद्य पिणाऱ्यांवर गुन्हा
रत्नागिरी ः तालुक्यातील वरवडे-तिवरी बंदराकडे जाणाऱ्या सार्वजनिक रस्त्यावर मद्यपान करणाऱ्या संशयित तरुणाविरुद्ध जयगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुदेश यशवंत वसावे (वय ३८) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना गुरुवारी (ता. २६) दुपारी निदर्शनास आली. या प्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल आदित्य अंकार यांनी जयगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. दरम्यान, शहरातील मिरजोळे-एमआयडीसी येथील रस्त्यावर मद्यपान करणाऱ्या प्रौढांविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकाश शिवराम पवार (वय ५२) असे संशयित प्रौढाचे नाव आहे. या प्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल रूपेश भिसे यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

