- विभागीय महसुल स्पर्धेचे ४० लाख थकले

- विभागीय महसुल स्पर्धेचे ४० लाख थकले

Published on

‘महसूल स्पर्धे’चे ४० लाख थकले
व्यावसायिकांवर आंदोलनाची वेळ ; तीन वर्षे हेलपाटे
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २८ : रत्नागिरीत मोठ्या थाटामाटात २०२३ मध्ये पार पडलेल्या ‘कोकण विभागीय महसूल क्रीडा स्पर्धां’ना आता तीन वर्षे उलटली, तरी या स्पर्धेसाठी दिवसरात्र राबणाऱ्या स्थानिक व्यावसायिकांचे हक्काचे पैसे अद्याप मिळालेले नाहीत. सुमारे ४० लाख रुपयांची थकबाकी न मिळाल्यामुळे अनेक स्थानिक व्यावसायिक कर्जबाजारी झाले आहेत. अतिथी देवो भवचा नारा देणाऱ्या रत्नागिरी जिल्हा प्रशासनाच्या या कारभाराबाबत व्यावसायिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
तत्कालीन जिल्हाधिकारी देवेंद्र सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय महसूल क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. कोकणातील सर्व जिल्ह्यांमधून हजारो कर्मचारी या स्पर्धेसाठी रत्नागिरीत दाखल झाले होते. या सर्वांच्या निवास, भोजन आणि शूटिंगची व्यवस्था स्थानिक व्यावसायिकांनी पूर्ण निष्ठेने केली होती. या आयोजनासाठी प्रशासनाने केवळ सरकारी निधीच नव्हे, तर खासगी कंपन्यांकडील सीएसआर फंडातून निधी मिळवला होता. एवढा पैसा जमा असतानाही स्थानिकांची बिले का थकवली, असा प्रश्न बिले थकलेल्या व्यावसायिकांनी उपस्थित केला आहे.
​मोठा सोहळा करण्याच्या नावाखाली चमकोगिरी करणाऱ्या प्रशासनाने गरीब व्यावसायिकांना वाऱ्यावर सोडले आहे. व्याजाने पैसे काढून आणि आपली सर्व साधनसामग्री पणाला लावून या व्यावसायिकांनी स्पर्धा पार पाडली. मात्र, तीन वर्षे उलटूनही त्या व्यावसायिकांना बिलांची रक्कम मिळवण्यासाठी जिल्हा प्रशासनाचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. हक्काचे पैसे मिळवण्यासाठी त्या व्यावसायिकांवर आता आंदोलनाची वेळ आली आहे.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com