शिंदे शिवसेनेचा स्वतंत्र गट, गटनेतेपदी नारकर
27630
शिंदे शिवसेनेचा स्वतंत्र
गट, गटनेतेपदी नारकर
सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. २७ ः जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीची चाहूल लागताच राजकीय हालचालींना वेग आला असून शिंदे शिवसेनेच्या जिल्हा परिषद सदस्यांनी ‘शिवसेना जिल्हा परिषद पक्ष’ नावाचा स्वतंत्र गट स्थापन केला आहे. या गटाच्या गटनेतेपदी केशव तथा दीपक नारकर यांची निवड करण्यात आली. याबाबतचे पत्र आज जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
जिल्हा परिषद निवडणुकीत शिंदेसेना पक्षाकडून निवडून आलेले १३ सदस्य तसेच एका अपक्ष सदस्याचा पाठिंबा मिळून एकूण १४ सदस्यांचा हा गट तयार केला आहे. यासंदर्भातील अधिकृत पत्र गटनेते नारकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आले.
नव्या गटात केशव उर्फ दीपक नारकर, तुकाराम साईल, नागेश आईर, रुपेश कानडे, संतोष साटविलकर, सुधन कवठणकर, साक्षी तळेकर, यज्ञा साळगावकर, दीपलक्ष्मी पडते, सुमेधा पाताडे, वर्षा सांबारी, सोनाली घाडीगावकर, अक्षता गावडे आणि रुहिता तांबे यांचा समावेश आहे. अध्यक्ष निवडणुकीपूर्वीच गटबांधणी स्पष्ट झाल्याने जिल्हा परिषदेत पुढील सत्तासमीकरणांबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. ‘शिवसेना जिल्हा परिषद पक्ष’च्या स्थापनेमुळे राजकीय वातावरण अधिक तापण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

