महावितरणच्या सासोलीतील
सबस्टेशन परिसरात आग

महावितरणच्या सासोलीतील सबस्टेशन परिसरात आग

Published on

27632

महावितरणच्या सासोलीतील
सबस्टेशन परिसरात आग

उनामुळे रौद्ररुप, उपकरणे जळाली

सकाळ वृत्तसेवा
दोडामार्ग, ता. २७ : सासोली येथील विद्युत सबस्टेशनच्या ट्रान्सफॉर्मरमध्ये स्पार्किंग होऊन लागलेल्या आगीत काही उपकरणे जळाली, तर परिसरातील जंगली झाडे जळून खाक झाली. ही घटना शुक्रवारी दुपारच्या दरम्याने घडली असून कडाक्याच्या उन्हात आगीने रौद्ररुप धारण केले होते. ही आग कसई दोडामार्ग नगरपंचायतीच्या अग्निशमन बंबाच्या साहाय्याने अटोक्यात आणली.
घटनास्थळाहून मिळालेली माहिती अशी, सासोली येथे विद्युत विभागाचे सबस्टेशन आहे. या सबस्टेशनच्या ट्रान्सफॉर्मरमध्ये आज दुपारी स्पार्क झाले. त्यामुळे उडालेल्या ठिणगीमुळे वाळलेल्या गवताने पेट घेतला. कडाक्याचे ऊन असल्याने आगीने रौद्ररुप धारण केले. आगीचे लोट आकाशात उसळू लागल्याने ग्रामस्थांनी त्या दिशेने धाव घेतली; मात्र आग अटोक्यात आणणे शक्य नसल्याने अखेर कसई दोडामार्ग नगरपंचायतीचा अग्निशमन बंब बोलावला. या घटनेचे वृत्त समजताच नगराध्यक्ष चेतन चव्हाण, आनंद तळणकर, पंचायत समिती सदस्य संजय सातार्डेकर, समीर रेडकर आदींनी धाव घेतली. अग्निशमन बंबाद्वारे आगीचा उडालेला भडका आटोक्यात आणला. या आगीत आजूबाजूचे गवत व जंगली झाडे जळून खाक झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com