डीजीके कॉलेजमध्ये संगमेश्वरी बोली
-rat२८p१.jpg-
P२६O२७७५५
रत्नागिरी : मराठी भाषा दिन कार्यक्रमात लेखक, कलाकार आनंद बोंद्रे यांचा सत्कार करताना प्र. प्राचार्य मधुरा पाटील. शेजारी प्रा. वसुंधरा जाधव, प्रा. ऋतुजा भोवड, प्रा. वैभव घाणेकर, प्रा. राखी साळगावकर आदी.
----------
डीजीकेत सगमेश्वरी बोलीचा रंग
मराठी राजभाषा दिनानिमित्त कार्यक्रम
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २८ : येथील देव, घैसास, कीर (डीजीके) कला, वाणिज्य आणि विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयात संगमेश्वरी बोलीचे कलाकार, लेखक आनंद बोंद्रे यांच्या सादरीकरणाने मराठी राजभाषा दिन साजरा करण्यात आला. देवरूखच्या श्री. बोंद्रे यांनी संगमेश्वरी बोलीत गाऱ्हाणे घातले आणि कोकण प्रदेशाची वैशिष्ट्य सांगणारे गीत सादर केले. कोकणच्या ग्रामीण लोककला आणि संगमेश्वरी बोलीतील गमतीजमती मनोरंजक पद्धतीने सांगितल्या.
मराठी विभाग आणि अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने कवी कुसुमाग्रज जन्मदिन आणि मराठी भाषा गौरव दिनानिमित्त गावसंस्कृती आणि मराठीची बोली या विषयावर श्री. बोंद्रे यांनी सादरीकरण केले. कवी कुसुमाग्रजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. शुभांगी पोटे हिने विद्यार्थिनीने मराठी भाषागीत गायिले. प्र. प्राचार्या आणि कार्यक्रमाच्या अध्यक्षा मधुरा पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला उपप्राचार्या वसुंधरा जाधव, कला शाखा प्रमुख प्रा. ऋतुजा भोवड, विज्ञान शाखा प्रमुख प्रा. वैभव घाणेकर, वाणिज्य शाखा प्रमुख प्रा. राखी साळगावकर आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

