मराठी भाषेच्या जतनासाठी नगरपालिका कटिबद्ध
मराठी भाषेच्या संवर्धनाचा निर्धार
पालिकेच्या वतीने विविध साहित्यिक उपक्रम
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण,ता. २८ ः मराठी ही केवळ भाषा नसून, आपली ओळख, संस्कृती आणि परंपरेचा पाया आहे. मराठी भाषेचे जतन व संवर्धन करणे, ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. मराठी भाषेसाठी जे जे सहकार्य लागेल ते नगरपालिकेच्या आणि शिवसेनेच्या माध्यमातून नक्कीच केले जाईल, असे आश्वासन नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी दिले.
चिपळूण पालिकेच्यावतीने लोकमान्य टिळक स्मारक वाचनालय व डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालय यांच्या सहकार्याने इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र येथे मराठी भाषा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात काव्यवाचन स्पर्धा, कथाकथन तसेच साहित्यिक सन्मान उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांच्या हस्ते संविधान व ग्रंथपूजनाने झाले तर मुख्याधिकारी संजय जाधव यांच्या हस्ते श्रीफळ वाढवण्यात आले.
स्पर्धेत एकूण १५ स्पर्धकांनी सहभाग घेतला. स्पर्धेचे परीक्षण प्रा. सुहास बारटक्के, प्रा. सोनाली खर्चे व रवींद्र गुरव यांनी केले. उद्या (ता.१) राज्याचे मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते साहित्यिकांचा सन्मान सोहळा होणार आहे. या कार्यक्रमाला शिक्षण, क्रीडा व सांस्कृतिक समिती सभापती हर्षाली पवार, नगरसेवक शशिकांत मोदी, नगरसेविका अंजली कदम, नीलम जाधव, पल्लवी महाडिक आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

