मंडणगड तालुक्यात महसूल समाधान मेळावा

मंडणगड तालुक्यात महसूल समाधान मेळावा

Published on

मंडणगडात ७पासून समाधान मेळावा
सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. २८ ः नागरिकांच्या महसूलविषयक तक्रारींचे जागेवर निराकरण तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ एकाच छताखाली देण्यासाठी मंडणगड तालुक्यात ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ अभियान राबवण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार अक्षय ढाकणे यांनी दिली.
या मोहिमेत प्रलंबित फेरफार प्रकरणे, ७/१२ व ८अ दुरूस्ती, ''जिवंत ७/१२'' मोहीम, तुकडेबंदी संदर्भातील प्रकरणे, भूमापन व उपविभाग परवानग्या, सामाजिक अर्थसाहाय्य योजना, विद्यार्थ्यांना दाखले वितरण आदी कामांचा निपटारा करण्यात येणार आहे. तसेच डिजिटल ७/१२, महाभूमी पोर्टल सेवा, ई-फेरफार, नोंदणी प्रणाली, ई-रेशनकार्ड, ई-केवायसी व डीबीटी अर्ज स्वीकृती यांसारख्या सुविधा नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येतील. आरोग्य तपासणी, औषध वितरण, तसेच कृषीविषयक मार्गदर्शनही शिबिरांमध्ये दिले जाणार आहे. ७ मार्चला समाधान शिबिराचा प्रारंभ होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com