-कथालेखन, पोस्टकार्ड लेखन स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव

-कथालेखन, पोस्टकार्ड लेखन स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव

Published on

-rat२८p४.jpg-
२६O२७७६०
लांजा ः कथालेखन आणि पोस्टकार्ड लेखन स्पर्धेतील विजेत्यांसह मान्यवर.
-----

पोस्टकार्ड लेखन स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव
सकाळ वृत्तसेवा
लांजा, ता. २८ ः मराठी राजभाषा गौरव दिनाचे औचित्य साधून शहरातील लोकमान्य वाचनालय येथे जिल्हास्तरीय कथालेखन व महाविद्यालयीन पोस्टकार्ड लेखन स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले.
या वेळी सह्याद्री श्रमिक शिक्षणसंस्थेचे उपाध्यक्ष डी. डी. देसाई, लोकमान्य वाचनालयाचे अध्यक्ष अॅड. अभिजित जेधे, उपाध्यक्ष योगेश वाघधरे, माजी उपाध्यक्ष विजय बेर्डे, माजी अध्यक्ष विजय नारकर, कार्यवाह उमेश केसरकर आदी उपस्थित होते. कथालेखन स्पर्धेत वर्षा पोंक्षे (विस्कटलेली घडी), प्रवीण कांबळे (ऋणानुबंध), रेशमा राणे-जाधव (नामा जोगतीण) यांना अनुक्रमे क्रमांक मिळाले होते. त्यांचा गौरव मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. पोस्टकार्ड लेखन स्पर्धेत आदित्य पांचाळ, आदिती पावसकर, साहिल मोर्ये या स्पर्धकांनी यश मिळवले. विजेत्या स्पर्धकांचा सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व रक्कम देऊन गौरव करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com