-होळीसाठी पनवेल-रत्नागिरी अनारक्षित विशेष रेल्वे
पनवेल-रत्नागिरी अनारक्षित विशेष रेल्वे
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २८ ः होळी सणानिमित्त प्रवाशांच्या सोयीसाठी मध्यरेल्वे पनवेल-रत्नागिरीदरम्यान ६ अतिरिक्त अनारक्षित विशेष रेल्वेगाड्या चालवणार आहे. तसेच दिवा-चिपळूण अनारक्षित विशेष रेल्वेगाडीही चालवण्यात येणार आहे. ही गाडी १ मार्चऐवजी २ मार्चपासून चालवण्यात येईल.
मध्यरेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, पनवेल-रत्नागिरी-पनवेल अनारक्षित विशेष रेल्वेगाडीच्या ६ फेऱ्या धावतील. मेमू विशेष रेल्वेगाडी २७ फेब्रुवारीपासून धावण्यास सुरुवात झाली.
अनारक्षित विशेष रेल्वेगाडी १ मार्चऐवजी २ ते ८ मार्चदरम्यान दररोज रात्री ११.२५ वा. दिवा येथून सुटेल आणि चिपळूण येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ६.३० वा. पोहोचेल. तसेच दुसरी अनारक्षित विशेष रेल्वेगाडी १ ते ८ मार्चदरम्यान दररोज दुपारी ३.३० वा. चिपळूण येथून सुटेल आणि दिवा येथे त्याच दिवशी रात्री ११.१० वा. पोहोचेल. या रेल्वेगाडीला निळजे, तळोजा पाचनंद, कळंबोली, पनवेल, सोमाटणे, आपटा, जिते, पेण, कासू, नागोठणे, रोहा, कोलाड, इंदापूर, माणगाव, गोरेगाव रोड, वीर, सापे वामणे, करंजाडी, विन्हेरे, दिवाणखवटी, कळंबणी बुद्रुक, खेड आणि अंजणी येथे थांबा देण्यात येईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

