मालवण पंचायत समितीत भाजपच्या गटनेतेपदी सुर्वे
27766
मालवण पंचायत समितीत
भाजपच्या गटनेतेपदी सुर्वे
मालवण, ता. २८ : येथील पंचायत समितीच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत निवडून आलेल्या भाजपच्या सदस्यांनी पंचायत समिती स्तरावर आपला अधिकृत पक्षीय गट स्थापन केला आहे. या गटनेतेपदी दीपक भागोजी सुर्वे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. या संदर्भातील अधिकृत पत्र आणि ठराव जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्याकडे सादर केले.
२३ फेब्रुवारीला झालेल्या विशेष बैठकीत हा निर्णय घेतला होता. भाजपने आपल्या गटाची नोंदणी करताना गटाचे नाव ‘भारतीय जनता पार्टी पंचायत समिती मालवण’ असे निश्चित केले आहे. गटनेते दीपक सुर्वे (चिंदर), उपगटनेते श्रीमती योजना कांबळी (कोळंब), प्रतोद- दीपक सुर्वे, सदस्य- सीमा परुळेकर (आडवली मालडी), माधुरी मसुरकर (वराड), घन:श्याम झाड (वायरी भुतनाथ), संतोष गावडे (सुकळवाड), असे सदस्य आहेत. गट नोंदणीसाठी आवश्यक सर्व कागदपत्रे, ज्यात सभेची नोटीस, इतिवृत्त, निवडणूक प्रमाणपत्रे आणि प्रतिज्ञापत्रांचा समावेश आहे, ती प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

