जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत नेमळेची सानिका प्रथम

जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत नेमळेची सानिका प्रथम

Published on

27764

निबंध स्पर्धेमध्ये
सानिका प्रथम
मालवण : समाज कल्याण विभाग सिंधुदुर्ग व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे (बार्टी) यांच्या वतीने आयोजित महाविद्यालयीन पातळीवरील जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत नेमळे पंचक्रोशी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय नेमळेच्या सानिका सत्यवान राऊळ हिने प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. घरघर संविधान या कार्यक्रमांतर्गत महाविद्यालयीन गटासाठी भारतीय संविधानातील मूलभूत अधिकार या विषयावर निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत द्वितीय - वैश्विका नागेश कदम (संत राऊळ महाराज महाविद्यालय कुडाळ), तृतीय - शितल अनिल पवार (वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कट्टा) यांनी क्रमांक प्राप्त केले. स्पर्धेचे परीक्षण बार्टीचे मालवण समतादूत संग्राम कासले यांनी केले. स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना समाज कल्याण सहाय्यक आयुक्त संतोष चिकणे यांच्या उपस्थितीत रोख रक्कम आणि स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याचे बार्टीचे प्रकल्प अधिकारी विजय कदम यांनी सांगितले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com