रत्नागिरी आरटीओच्या ताफ्यात ''डिजिटल डोळा

रत्नागिरी आरटीओच्या ताफ्यात ''डिजिटल डोळा

Published on

-rat२८p६.jpg-
२६O२७७७१
रत्नागिरी ः अत्याधुनिक रडार तंत्रज्ञानाने सज्ज असलेली गाडी.
----
महामार्गावर ‘आरटीओ’चा डिजिटल पहारा
ताफ्यात तंत्रज्ञाने सज्ज वाहने ; बेशिस्त वाहनचालकांनो सावधान, ५०० मीटरवरूनच कापले जाणार ई-चलन
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २८ : महामार्गावर वेगमर्यादा ओलांडणाऱ्या आणि नियमांना केराची टोपली दाखवणाऱ्या बेशिस्त वाहनचालकांना आता चांगलाच लगाम बसणार आहे. रत्नागिरी उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या ताफ्यात आता, अत्याधुनिक रडार तंत्रज्ञानाने सज्ज असलेली ‘इंटरसेप्टर’ वाहने दाखल झाली आहेत. विशेष म्हणजे, आता कारवाईसाठी तुमचे वाहन थांबवण्याची गरज उरणार नाही; अर्धा किलोमीटर अंतरावरूनच हा ‘डिजिटल डोळा’ तुमचा नियमभंग टिपून थेट मोबाईलवर दंड पाठवणार आहे. त्यामुळे आता प्रादेशिक परिवहन विभाग (आरटीओ) ‘ॲक्शन मोड’मध्ये आहे.
​ही नवीन ‘इंटरसेप्टर वाहने’ उच्चदर्जाचे कॅमेरे आणि लेझर रडार तंत्रज्ञानाने सज्ज आहेत. महामार्गावर भरधाव वेगाने धावणाऱ्या वाहनांचा नंबर ही यंत्रणा ५०० मीटर अंतरावरूनच अचूक टिपते. ही प्रणाली पूर्णपणे स्वयंचलित (Automatic) असून, नियमभंग होताच सिस्टिम आपोआप ई-चलन जनरेट करते. अर्धा किलोमीटर लांबूनच वाहनाची नंबरप्लेट ओळखण्याची क्षमता आहे. हायडेफिनिशन कॅमेऱ्यांमुळे दिवसाप्रमाणेच रात्रीच्या अंधारातही अचूक वेग आणि नंबर टिपता येते. एका तासाला तब्बल ३०० केसेस (कारवाया) करण्याची या प्रणालीची क्षमता आहे. पूर्वी वाहन थांबवण्यावरून चालक आणि आरटीओ कर्मचाऱ्यांमध्ये होणारे वाद आता टळणार आहेत. पुरावा म्हणून वाहनाचा फोटो थेट चालकाच्या मोबाईलवर पाठवला जाणार आहे. जिल्ह्यातील वाढती वाहनसंख्या आणि महामार्गावरील अपघातांचे सत्र रोखण्यासाठी ही यंत्रणा आता प्रमुख महामार्गांवर तैनात केली जाणार आहे.
---
कोट
केवळ वेगावरच नाही तर विनाहेल्मेट आणि विना सीटबेल्ट प्रवास, ट्रिपल सीट दुचाकी चालवणे, चुकीच्या बाजूने वाहन चालवणे, वाहन चालवताना मोबाईलवर बोलणे, या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावरही कारवाई होणार आहे. केवळ वेगच नाही तर प्रत्येक चुकीच्या हालचालीवर हा ‘डिजिटल डोळा’ नजर ठेवून असणार आहे. ही यंत्रणा चालकांच्या सुरक्षिततेसाठी असून, रस्ते अपघातांना आळा घालण्यास यामुळे मोठी मदत होणार आहे. त्यामुळे वाहनचालकांनी शिस्तीचे पालन करावे.
-राजवर्धन करपे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, रत्नागिरी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com