घरफोड्या, भिकाऱ्यांना रोखा
27779
घरफोड्या, भिकाऱ्यांना रोखा
बांदावासीयांची मागणी; पोलिस अधिकाऱ्यांना निवेदन
बांदा, ता. २८ : शहरात घडणाऱ्या घरफोड्यांच्या पार्श्वभूमीवर व वाढलेल्या भिकाऱ्यांच्या प्रमाणावर निर्बंध आणावेत याकरीता बांदा भाजपच्या शिष्टमंडळाने येथील पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक गजेंद्र पालवे यांची भेट घेत विविध विषयांवर चर्चा करत नागरिकांच्या सुरक्षेबाबत निवेदन सादर केले.
यात शहरातील उड्डाणपुलाखाली राहणाऱ्या अनोळखी व्यक्तींमुळे बांदा बाजारपेठेतील स्थानिक व्यापारी व नागरिकांना त्रास होत असून त्यांना तेथून तत्काळ हटवण्याची मागणी केली. शहरातील बंद ‘सीसीटीव्ही’ सुरू करण्याचीही विनंती करण्यात आली. आवश्यक ठिकाणी नवीन ‘सीसीटीव्ही’ बसवण्याची मागणी करण्यात आली. यासोबतच सोमवारच्या आठवडा बाजारात पोलिस कर्मचारी तैनात ठेवावेत व शहरातील वाड्यांमध्ये फिरणाऱ्या फिरत्या विक्रेत्यांवर कडक निर्बंध आणावेत. अशा प्रकारच्या मागण्या निवेदनाद्वारे केल्या.
यावर सहाय्यक पोलिस निरीक्षक गजेंद्र पालवे यांनी सांगितले, की पुलाखाली वास्तव्य करणाऱ्या व्यक्तींवर ग्रामपंचायत प्रशासनाच्या सोबतीने तातडीने कारवाई करण्यात येईल. तसेच शहरातील ‘सीसीटीव्ही’ संदर्भात जिल्हा अधीक्षक कार्यालयाकडे मागणी सादर केली आहे. सोमवार बाजारात पोलिसांची गस्तही वाढवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. नागरिकांच्या सुरक्षेसाठी रात्रीची गस्त देखील वाढवण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी भाजपचे बांदा मंडल उपाध्यक्ष गुरु कल्याणकर, उपसरपंच रत्नाकर आगलावे, देवस्थान समिती अध्यक्ष व ग्रामपंचायत सदस्य राजाराम ऊर्फ बाळू सावंत, भाजप युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस व ग्रामपंचायत सदस्य जावेद खतीब, सदस्य राजाराम ऊर्फ आबा धारगळकर, शहराध्यक्ष बाबा काणेकर, नीलेश नाटेकर, शैलेश केसरकर, सुनील धामापूरकर आदी भाजप पदाधिकारी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

