रामपूर येथील शिबिरात ३०० रुग्णांची तपासणी
rat1p1.jpg-
27869
चिपळूण ः नेत्रतपासणी शिबिराप्रसंगी माजी खासदार हुसेन दलवाई, उद्योजक निलेश चव्हाण व सहभागी झालेले ग्रामस्थ.
रामपूर येथील शिबिरात
३०० रुग्णांची तपासणी
स्कॉन उद्योग समूहाचा पुढाकार ; ९० जणांना चष्म्याचे वाटप
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १ ः स्कॉन उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष निलेश चव्हाण यांच्या पुढाकाराने, स्कॉन प्रो. फाउंडेशन, रोटरी क्लब ऑफ स्कॉन प्रो. आणि श. ना. चव्हाण चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने रामपूर प्राथमिक आरोग्य केंद्र येथे मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर उत्साहात झाले. या शिबिराचा रामपूर परिसरातील ३०० रुग्णांनी लाभ घेतला असून, त्यातील ९० गरजूंना मोफत चष्म्याचे वाटप करण्यात आले.
उद्योजक निलेश चव्हाण हे जिल्ह्यात सातत्याने आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रावर भर देऊन सामाजिक उपक्रम राबवत आहेत. गेल्या काही वर्षांत चिपळूण, खेड आणि गुहागर तालुक्यातील दिव्यांगांसाठी त्यांनी विशेष शिबिरे घेऊन कृत्रिम अवयवांची उपलब्धता करून दिली होती. याच कार्याचा एक भाग म्हणून रामपूर येथे हे नेत्र शिबिर आयोजित करण्यात आले. यातील मोतीबिंदू असलेल्या रुग्णांच्या शस्त्रक्रिया १० ते १२ मार्च या कालावधीत वालावलकर रुग्णालय (डेरवण) येथे मोफत केल्या जाणार आहेत. रुग्णांच्या प्रवासाची आणि भोजनाची व्यवस्थाही विनामूल्य करण्यात येणार आहे.
माजी खासदार हुसेन दलवाई यांनी निलेश चव्हाण यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक करत त्यांना धन्यवाद दिले. तसेच, रामपूर-मार्गताम्हणे परिसरात उद्योगधंद्यांना चालना देऊन स्थानिकांना मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध करून देण्याचे आवाहनही त्यांनी केले. या शिबिरासाठी रामपूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य प्रमोद निवळकर, पंचायत समिती सदस्य गौरव पाटेकर, सौ. सुप्रिया वंजारे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. ज्योती जाधव, सरपंच अमिता चव्हाण, डॉ. राजेंद्र चव्हाण, डॉ. मनोज रावराणे, डॉ. निकिता शिर्के, डॉ. धनराज मुंडे उपस्थित होते. तसेच रोटरी क्लब स्कॉन पुणेचे पहिले अध्यक्ष महेश मायदेव, विशाल भोसले, संजय रोडे, प्रशांत सुरडीकर, निनाद चव्हाण, शैलेश मोरे, दत्तात्रेय मोरे, अनिलकुमार जोशी आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

