कोकणच्या समृद्ध साहित्य परंपरेचे पाईक होऊया

कोकणच्या समृद्ध साहित्य परंपरेचे पाईक होऊया
Published on

कोकणच्या समृद्ध साहित्य परंपरेचे पाईक होऊया
डॉ. विकास पाटील ; खापणे महाविद्यालयात मराठी राजभाषा दिन साजरा
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. १ ः ‘‘कोकणला निसर्गसंपन्नतेसोबतच महान सांस्कृतिक आणि साहित्यिक वारसा लाभला आहे. या मातीतील अनेक साहित्यिकांनी मराठीला वैभवाच्या शिखरावर नेले आहे. मराठी भाषेला आणि साहित्याला जागतिक उंचीवर नेणाऱ्या या महान विभूतींच्या परंपरेचे आपण पाईक होऊया,’’ असे प्रतिपादन डॉ. विकास पाटील यांनी केले.
येथील श्री मनोहर हरी खापणे महाविद्यालयात आयोजित ‘मराठी राजभाषा दिन’ कार्यक्रमात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य डॉ. पी. एस. मेश्राम, मराठी भाषा व वाङ्मय मंडळ प्रमुख डॉ. बी. टी. दाभाडे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचा प्रारंभ दीपप्रज्वलन आणि कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आला.
डॉ. पाटील यांनी आपल्या भाषणात कोकणच्या भूमीतील दिग्गज साहित्यिकांचा आढावा घेतला. ते म्हणाले की, ‘‘मराठीला ज्ञानपीठ मिळवून देणारे वि. स. खांडेकर आणि वि. दा. करंदीकर यांची हीच कर्मभूमी आहे. मराठी कवितेचे जनक कवी केशवसुत, आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर, बाबूराव पराडकर, तसेच आपल्या लेखनातून सामाजिक क्रांती घडवणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर याच मातीतले आहेत. साने गुरुजी, मंगेश पाडगावकर, मधु मंगेश कर्णिक, श्री. ना. पेंडसे, जयवंत दळवी यांसारख्या अनेक शब्दप्रभूंनी मराठी साहित्याची समृद्ध परंपरा जपली आहे.’’
अध्यक्षीय मनोगतात प्रभारी प्राचार्य डॉ. पी. एस. मेश्राम म्हणाले की, ‘‘मराठी आता ''अभिजात भाषा'' झाली आहे. या भाषेचा गौरव वाढवण्यासाठी तरुणांनी भाषिक अस्मिता जपली पाहिजे आणि मराठीतील दर्जेदार साहित्य जनसामान्यांपर्यंत पोहोचवले पाहिजे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com