रत्नागिरी जिल्हा कार्यकारणी जाहीर

रत्नागिरी जिल्हा कार्यकारणी जाहीर

Published on

rat1p11.jpg
27871
रत्नागिरी : सेवा शक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघातर्फे एसटी विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे यांना निवेदन देताना संतोष बोरकर, योगेश भोसले, वसंत कांबळे आदी.

सेवा शक्ती एसटी कर्मचारी संघाची
रत्नागिरी जिल्हा कार्यकारणी जाहीर
रत्नागिरी, ता. १ : सेवाशक्ती संघर्ष एस. टी. कर्मचारी संघाची रत्नागिरी विभागाची कार्यकारिणी निवडण्यात आली. जिल्हाध्यक्षपदी संतोष बोरकर, कार्याध्यक्ष जयप्रकाश दळवी, सचिव वसंत कांबळे यांची निवड करण्यात आली. या कार्यकारिणीची प्रत एसटीचे विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे यांच्याकडे देण्यात आली.
उपाध्यक्ष योगेश भोसले, संजिव बने, तेजस रायबागकर (राजापूर आगार) यांच्यासह विधीज्ञ म्हणून ॲड. संकेत लकेश्री, सचिव वसंत कांबळे (लांजा आगार), सहसचिव सतिश चव्हाण (गुहागर आगार), खजिनदार अक्षय मांडवकर (विभागीय भांडार), सहखजिनदार विलास मोरे (मंडणगड आगार), कार्याध्यक्ष जयप्रकाश दळवी (वि.का.शा), जिल्हा संघटक विजय गोरे (वि.का.शा), प्रसिध्दी सचिव महेंद्र विखारे (मंडणगड आगार), महिला संघटक सौ. दुर्गा मोर्लेकर (राजापूर आगार), संघटक सचिव अंकुश शिंदे (लांजा आगार), कार्यकारिणी सदस्य मंगेश गोवळकर (वि.का.शा), वेताळ चव्हाण (गुहागर), शशिकांत कांबळे (वि.का.शा), संतोष आबादार (विभागीय भांडार), संतोष आरवकर (भाजपा), निलेश महादेव आखाडे (भाजपा) यांची निवड कार्यकारिणीत करण्यात आली.
आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत यांच्या मार्गदर्शनाखाली सतिश मेटकरी (सरचिटणीस), प्रकाश कांबळे (केंद्रिय उपाध्यक्ष) यांच्या नेतृत्वात कार्यकारिणी निवडण्यात आली.
कर्मचारी हिताकरीता अमूल्य साथ मिळावी व कामगार हिताचे निर्णय घेऊन कर्मचारी यांना सहकार्य करावे यासाठीच सेवा शक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघ काम करत राहील. कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी संघटना मजबुतीने काम करेल असा विश्वास श्री. बोरकर यांनी व्यक्त केला. विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे यांना कार्यकारिणीची प्रत दिल्यानंतर काही महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. विभाग नियंत्रकांनी नवनियुक्त पदाधिकारी यांना शुभेच्छा दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com