क्षत्रिय मराठा मंडळातर्फे ६ रोजी शिवजयंतीला निघणार शोभायात्रा
क्षत्रिय मराठा मंडळातर्फे ६ रोजी
शिवजयंतीला निघणार शोभायात्रा
रत्नागिरी, ता. १ : येथील क्षत्रिय मराठा मंडळातर्फे दरवर्षी तिथीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त जयस्तंभ ते मारुती मंदिर या मार्गावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पालखीची सवाद्य मिरवणूक तथा शोभायात्रा काढण्यात येणार आहे. यंदा या शोभायात्रेला रत्नागिरी शहरासह आसपासच्या गावांतील शेकडो मराठा बंधू-भगिनी पारंपरिक वेषभूषेत सहभागी होणार आहेत.
येत्या ६ मार्च रोजी शोभायात्रेला सायंकाळी ५.३० वाजता जयस्तंभ येथून सुरवात होऊन रात्री १० वाजता मारुती मंदिर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सांगता होणार आहे. प्रथेप्रमाणे सायंकाळी ४ वाजता रत्नदुर्ग किल्ल्यावरील देवी भगवती मंदिर येथून शिवज्योतीचे प्रस्थान होऊन सायंकाळी ५.३० वाजता जयस्तंभ येथे आगमन झाल्यानंतर छत्रपती महाराजांच्या पालखीचे मिरवणुकीला आरंभ होईल.
शोभायात्रेत विविध ढोल, ताशे, झांजपथक, मर्दानी खेळ आणि महाराजांच्या जीवनावरील चित्ररथांचा समावेश आहे. ज्यांना चित्ररथांचा समावेश करायचा आहे त्यांनी मंडळाचे पदाधिकारी राकेश नलावडे, प्राचीताई शिंदे, प्रदीप साळवी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन क्षत्रिय मराठा मंडळाचे अध्यक्ष सुरेशराव सुर्वे यांनी केले आहे.
रत्नागिरी शहर व पंचक्रोशीतील सर्व मराठा समाज बांधव एकत्र येऊन ही शोभायात्रा आयोजित करण्यात येत आहे. रत्नागिरी पंचक्रोशीतील गावातून देखावा चित्ररथ करणार असतील तर क्षत्रिय मराठा मंडळाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

