उद्यावर ढकलण्याची सवय : प्रगतीत मोठा अडथळा
(टिप ः फोटो मागील सदरातून घेणे)
राखूया मनाचे आरोग्य---------लोगो
इंट्रो
‘‘आजचे काम उद्यावर आणि उद्याचे काम परवावर...’’ ही प्रवृत्ती आपल्यापैकी अनेकांमध्ये आढळते. मानसशास्त्राच्या भाषेत यालाच ''प्रोक्रॅस्टिनेशन'' (Procrastination) अर्थात ''टाळाटाळ'' असे म्हणतात. वरवर पाहता ही सवय साधी वाटत असली, तरी ती हळूहळू आपल्या कार्यक्षमतेची आणि मानसिक शांततेची शिकार करते.
- डॉ. स्नेहल तोडणकर-अंधारे, रत्नागिरी
एमबीबीएस, डी.पी.एम., एमआयपीएस
------------
उद्यावर ढकलण्याची सवय : प्रगतीत मोठा अडथळा
टाळाटाळ म्हणजे नेमके काय 0 टाळाटाळ म्हणजे केवळ आळस नव्हे. आळशी माणूस काहीच करत नाही, पण टाळाटाळ करणारा माणूस व्यग्र असतो—फक्त महत्त्वाच्या कामांऐवजी तो कमी महत्त्वाची किंवा आनंद देणारी कामे करण्यात वेळ घालवतो. उदाहरणार्थ, अभ्यासाला बसण्याऐवजी मोबाईल स्क्रोल करणे किंवा ऑफिसचा महत्त्वाचा रिपोर्ट बनवण्याऐवजी डेस्क साफ करत बसणे.
आपण टाळाटाळ का करतो 0 संशोधनानुसार, टाळाटाळ ही वेळेच्या नियोजनापेक्षा भावनेच्या नियोजनाची समस्या जास्त आहे. "जर मी हे काम नीट करू शकलो नाही तर0" या अपयशाच्या भीतीपोटी अनेकजण कामाला सुरुवातच करत नाहीत. किंवा काम अगदी ''परफेक्ट'' झाले पाहिजे, या हट्टामुळे कामाची सुरुवात लांबणीवर पडते. एखादे काम खूप मोठे किंवा कठीण वाटले की आपण त्यापासून दूर पळण्याचा प्रयत्न करतो वा स्वतःला सोशल मीडिया किंवा वेब सीरिज बघण्यात डिस्ट्रॅक्ट करतो.
* टाळाटाळ केल्याने नेमके काय परिणाम होतील 0
सततची टाळाटाळ केवळ कामाचा डोंगर वाढवत नाही, तर ती ताणतणाव आणि अपराधीपणाची भावना निर्माण करते. शेवटच्या क्षणी काम उरकताना कामाचा दर्जा खालावतो आणि त्याचा परिणाम आपल्या करियरवर व नात्यांवरही होऊ शकतो. या चक्रातून बाहेर पडण्यासाठी आपण पुढीलप्रमाणे काही सोपे उपाय करू शकतो.
१) कामाचे विभाजन करा : मोठे काम पाहून घाबरण्यापेक्षा त्याचे लहान लहान तुकडे करा. एकदा लहान पाऊल उचलले की पुढचा मार्ग सोपा होतो.
२) ५-सेकंद नियम : जेव्हा एखादे काम करण्याची इच्छा होईल, तेव्हा मनात ५-४-३-२-१ असे उलटे मोजा आणि लगेच कामाला लागा.
३) २ मिनिटांचा नियम ः जर एखादे काम पूर्ण करण्यासाठी दोन मिनिटांपेक्षा कमी वेळ लागणार असेल, तर ते ''आत्ताच'' करा.
४) distractions पासून दूर राहा : काम करताना मोबाईल बाजूला ठेवा किंवा नोटिफिकेशन बंद करा.
५) कमी वेळेचे लक्ष्य : स्वतःला सांगा की तुम्ही फक्त ५ मिनिटे काम कराल. फक्त ५ मिनिटे काम करून तुम्ही थांबू शकता. पण यानंतर आपसूक ते काम आपल्याकडुन जास्त वेळ केले जाते.
६) स्वतःबद्दल करुणा : संशोधनानुसार, टाळाटाळ केल्याबद्दल स्वतःला माफ केल्याने पुन्हा टाळाटाळ करण्याची शक्यता कमी होते, कारण यामुळे कामाशी संबंधित असलेला ताण कमी होतो.
आता वैद्यकीय व मानसशास्त्र दृष्टिकोनातून नेमकी टाळाटाळ का होते ते बघूया....
''मूड रिपेअर'' सिद्धांत : आपण त्या ''कामाची'' टाळाटाळ करत नाही, तर त्या कामाशी संबंधित नकारात्मक भावनांपासून दूर पळतो. या भावनांमध्ये खालील गोष्टींचा समावेश असू शकतो:
चिंता : मी सुरुवात कुठून करू0
असुरक्षितता : हे काम नीट करण्यासाठी मी पुरेसा सक्षम नाही.
स्वतःबद्दल शंका : जर मी अपयशी ठरलो तर0
या अस्वस्थ भावनांपासून सुटका मिळवण्यासाठी आपला मेंदू आपल्याला विचलित करणाऱ्या कामांकडे वळवतो, ज्यामुळे काही काळासाठी आपला मूड सुधारतो. अशाप्रकारे कामाची टाळाटाळ होते व त्याक्षणी आपल्याला त्याचे वाईटसुद्धा वाटत नाही. आता यावर थोडक्यात उपाय काय तर, टाळाटाळीवर मात करण्यासाठी ''वेळेच्या नियोजना''ऐवजी ''भावनांच्या नियोजना''वर भर द्यावा!
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

