मुंबई विद्यापीठाचे यश
rat१p२०.jpg-
२६O२७८८८
साखरपा : विजेत्यांसमवेत मार्गदर्शक विलास रहाटे आणि केशर चोपडेकर
---
युवा महोत्सवात मुंबई विद्यापीठ अव्वल
विलास रहाटेंचे मार्गदर्शन ; कलाप्रकारांत २५ पारितोषिके
सकाळ वृत्तसेवा
साखरपा, ता. ३ ः कर्नाटक येथे नुकत्याच पार पडलेल्या ३९ व्या दक्षिण-पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ युवा महोत्सवात मुंबई विद्यापीठाने आपल्या कौशल्याचा ठसा उमटवत सर्वसाधारण विजेतेपद पटकावले आहे. विशेष म्हणजे, देवरुख येथील प्रसिद्ध रांगोळीकार आणि चित्रकार विलास रहाटे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई विद्यापीठाच्या संघाने हे देदीप्यमान यश संपादन केले.
म्हैसूर येथील ‘जे.एस.एस. अकॅडमी’ मध्ये हा महोत्सव पार पडला. या स्पर्धेत संगीत, नृत्य, नाट्य, साहित्य आणि ललित कला अशा पाचही गटांत मुंबई विद्यापीठाच्या संघाने एकूण ७६ गुणांसह अव्वल स्थान मिळवले. संपूर्ण महोत्सवात संघाने विविध कलाप्रकारांत एकूण २५ पारितोषिके आपल्या नावे केली. गेल्या तीन वर्षांपासून विलास रहाटे मुंबई विद्यापीठाच्या कलासंघाला मार्गदर्शन करत आहेत. यंदा त्यांच्या मार्गदर्शनाखाली मनोज चव्हाणने रांगोळी आणि कोलाजमध्ये तर प्रथमेश मेस्त्रीने क्ले-मॉडेलिंग प्रकारात यश मिळवले. या विद्यार्थ्यांनी आपल्या कलेची चुणूक दाखवत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. विलास रहाटे यांना केशर चोपडेकर यांचेही मोलाचे सहकार्य लाभले.
या यशासह मुंबई विद्यापीठाचा संघ आता चेन्नई येथील श्री सत्यभामा इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी येथे १० ते १४ मार्च दरम्यान होणाऱ्या ३९ व्या राष्ट्रीय आंतरविद्यापीठ युवा महोत्सवासाठी पात्र ठरला आहे. या यशाबद्दल विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी, प्र-कुलगुरू डॉ. अजय भामरे आणि कुलसचिव डॉ. प्रसाद कारंडे यांनी मार्गदर्शक विलास रहाटे, केशर चोपडेकर व सहभागी विद्यार्थ्यांचे विशेष अभिनंदन केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

