संगमेश्वर तालुका क्रिकेट समिती अध्यक्षपदी मारुती वाघमोरे

संगमेश्वर तालुका क्रिकेट समिती अध्यक्षपदी मारुती वाघमोरे

Published on

rat1p21.jpg-
27889
मारुती वाघमोरे

संगमेश्वर तालुका क्रिकेट समिती
अध्यक्षपदी मारुती वाघमोरे
साखरपा, ता. १ : संगमेश्वर तालुका क्रिकेट समिति (ग्रामीण) यांची कार्यकारिणी जाहीर झाली असून त्या समितीच्या अध्यक्षपदी साखरपा येथील मारुती वाघमोरे यांची निवड केली आहे. त्याच बरोबर उपाध्यक्षपदी अमित जाधव, अभिराज नारकर आणि सूर्यकांत पांचाळ यांची निवड झाली.
सचिव म्हणून रणजीत पवार, सहसचिव म्हणून मयूरेश यादव, स्वप्नील माइन आणि अमित तळेकर काम पहाणार आहेत. रोहित जाधव हे खजिनदार तर सदस्यपदी शशिकांत गोरूले, आदित्य केळसकर, योगेश चव्हाण, अनिकेत शिदे, रिटेश पांचाळ यांची निवड करण्यात आली.

Marathi News Esakal
www.esakal.com