म्हापणमधील दोन्ही पुलांची तातडीने दुरुस्ती आवश्यक
27927
म्हापणमधील दोन्ही पुलांची
तातडीने दुरुस्ती आवश्यक
मडवळ ः अधिकाऱ्यांसोबत पाहणी
सकाळ वृत्तसेवा
म्हापण, ता. १ ः म्हापण सागरी महामार्गावर असणाऱ्या कुडाळकर वळण व नार्वेकरवाडी येथील पुलाचे आरसीसी पाईप जीर्ण झाले आहेत. कचरा अडकून हे पाईप बंद झाल्यामुळे हे दोन्ही पूल वाहतुकीसाठी धोकादायक बनले आहेत. या पुलांच्या दुरुस्तीचे काम तातडीने काम हाती घ्यावे, अशी मागणी माजी सरपंच तथा ग्रामपंचायत सदस्य गुरुनाथ मडवळ यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली.
श्री. मडवळ यांनी नुकतीच सार्वजनिक बांधकाम विभाग वेंगुर्लेचे सहाय्यक कार्यकारी अभियंता शिंदे यांच्यासोबत या दोन्ही पुलांची पाहणी केली. कुडाळकर वळण येथील सागरी महामार्गावर मधोमध भेग गेली आहे, ही बाब त्यांनी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. यावेळी श्री. शिंदे यांनी येणाऱ्या बजेटमध्ये हे धोकादायक पूल पूर्ण नवीन आरसीसी करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन दिले. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे आडोळे, विजय ठाकूर, सुभाष चव्हाण, चंद्रकांत घाडी, सुनील जोशी, जगदीश म्हापणकर तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

