सिंधुदुर्गनगरीत कामगारांना अत्यावश्यक संच वितरण
27957
सिंधुदुर्गनगरीत कामगारांना
अत्यावश्यक संच वितरण
सिंधुदुर्गनगरी, ता. १ ः बांधकाम कामगार कल्याण मंडळांतर्गत नोंदीत बांधकाम कामगारांना अत्यावश्यक संच वितरण केले जात आहे. याचा प्रारंभ आज ओरोस येथे करण्यात आला.
यावेळी भारतीय मजदूर संघांचे प्रदेश सचिव हरी चव्हाण, स्वाभिमान कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रसाद गावडे, जिल्हा परिषद सदस्या सुप्रिया वालावलकर, ठेकेदार संघटना उपजिल्हाध्यक्ष अमोल जंगले, भारतीय मजदूर संघ जिल्हा उपाध्यक्ष अशोक घाडीगावकर, उद्योजक संतोष वालावलकर आदी उपस्थित होते. या अत्यावश्यक संचामध्ये पत्र्याची पेटी, प्लास्टिक चटई, धान्य साठवण कोठी (क्षमता २५ व २२ किलो), बेडशीट, चादर, ब्लॅंकेट, साखर ठेवण्यासाठीचा डबा, चहा पावडर ठेवण्यासाठीचा डबा, वॉटर प्युरिफायर या वस्तूंचा समावेश आहे. दरम्यान, पहिल्या टप्प्यात आज ८०० कामगारांना अत्यावश्यक किटचे वाटप केले. बांधकाम कामगारांच्या कल्याणासाठी तसेच त्यांच्या कुटुंबीयांच्या आरोग्य, सुरक्षा आणि कल्याणासाठी कामगार विभागाकडून अनेक योजनांची अंमलबजावणी केली जात आहे. नोंदीत कामगारांसाठी मंडळाकडून यापूर्वी गृहोयोगी वस्तू भांडी संच व सुरक्षा संच योजनेचा लाभ दिला आहे. यामध्ये नवीन योजनेचा समावेश झाला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

