अतुट मैत्रीचा संदेश देणारे नाटक ''सखा''

अतुट मैत्रीचा संदेश देणारे नाटक ''सखा''

Published on

Rat१p३७.jpg-
२६O२७९५३
रत्नागिरी- तुषार को-ऑपरेटीव्ह हौसिंग सोसायटी-पुणे या संस्थेने केलेल्या ‘सखा’ या नाटकातील एक क्षण (नरेश पांचाळ- सकाळ छायाचित्रसेवा)
----
अतूट मैत्रीचा संदेश देणारे नाटक ‘सखा’
तुषार को- ऑपरेटिव्हचे सादरीकरण ; अभिनय नेपथ्याला रसिकांची दाद
नरेश पांचाळ ः सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, दि. ३ : खऱ्या मैत्रीचे महत्त्व, त्यातील निष्ठा आणि त्याग यांचे दर्शन घडवणारे ‘सखा’ नाटक नुकतेच रत्नागिरीत सादर झाले. लेखक-दिग्दर्शक ओम चव्हाण लिखित ही संहिता आर्थिक स्वार्थ, मानापमान आणि मतभेदांच्या पलीकडे जाऊन, संकटातही टिकून राहणाऱ्या मैत्रीचा सशक्त संदेश देते. राज्य नाट्य स्पर्धेच्या निमित्ताने ‘तुषार को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी’च्या वतीने येथील स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात हा प्रयोग सादर करण्यात आला. कलाकारांच्या अभिनय नेपथ्यात रंगलेल्या या नाटकाला रसिकांनी दाद दिली.
----
‘सखा’ ही दोन अंकी नाट्यकृती दोन मित्रांच्या नात्यावर आधारित आहे. फडतरे आणि देशमुख हे जिवलग मित्र आहेत. एकाला चित्रपट निर्माण करायचा आहे, तर दुसऱ्याला नाटक सादर करायचे आहे. मात्र, आर्थिक अडचणींमुळे त्यांच्या स्वप्नांमध्ये अडथळे निर्माण होतात. या अडचणींमुळे दोघांमध्ये वैचारिक मतभेदही होतात. चित्रपटासाठी सहनिर्माता शोधण्याचा प्रयत्न सुरू होतो. शिर्के नावाचे निर्माते काही अटी घालतात-निर्मिती आणि लेखनाचे सर्व हक्क त्यांच्याकडे राहतील. त्यामुळे लेखक गोविंद नाराज होऊन निघून जातो. तरीही फडतरे शिर्केंच्या अटी मान्य करतात आणि काही रक्कमही घेतात. त्यामुळे मित्रांमध्ये तणाव निर्माण होतो.
नाटकात पुराणातील श्रीकृष्ण-सुदामा तसेच श्रीकृष्ण-कर्ण यांच्या मैत्रीचे प्रसंग रंगवले जातात. श्रीकृष्ण कर्णाला पांडवांकडे येण्याचे आमंत्रण देतो, पण कर्ण दुर्योधनाशी असलेल्या मैत्रीमुळे नकार देतो. त्याचप्रमाणे सुदामाची श्रीकृष्णावरील निष्ठा आणि त्यांची भेट भावनिक रंगत आणते. सांदिपनी आश्रमातील शिदोरीचा प्रसंगही मैत्रीतील त्याग आणि प्रामाणिकपणाचे प्रतीक म्हणून दाखवला आहे. शेवटी सुदामा श्रीकृष्णाला भेटण्यासाठी द्वारकेला जातो, त्याचे आदराने स्वागत होते आणि नाटकाचा शेवट मैत्रीच्या उदात्त मूल्यांवर होतो. पुराणातील कृष्ण-सुदामा व कृष्ण-कर्ण यांच्या कथांद्वारे निष्ठा, कृतज्ञता, आपलेपणा आणि त्याग यांचे मूल्य अधोरेखित केले आहे. आधुनिक काळातील मित्रांच्या संघर्षाशी या कथा जोडून, स्वार्थ आणि मैत्री यांमधील संघर्ष प्रभावीपणे मांडला आहे.
----
सूत्रधार आणि साहाय
प्रकाश योजना: मधुरेश शाह, संगीत: दुर्गेश खिरे, चिन्मयी तांबे, दर्शन जोशी, ऑर्गन: पार्थ गरुड, तबला: राजस आपटे, कीबोर्ड: धीरज बडे, बासरी: हितेश क्षीरसागर, निखिल आठवले, नेपथ्य: शंतनू माने, तन्वी बोर्लीकर, रंगभूषा: दीप्ती थोरात, वेशभूषा: तृप्ती येवले, रंगमंच व्यवस्था: साक्षी परदेशी, ऋतुजा मोरे, पुष्कर ढगे.
-------
पात्र परिचय
फडतरे / सुदामा : ओम चव्हाण, देशमुख / कृष्ण : ओम मोकाशी, मुक्ताबाई / गुरुमाऊली : वैष्णवी साठे, लक्ष्मीबाई / म्हातारी : तृप्ती येवले, गणा व पेंद्या : मयूर पुरोहित, सदाशिवराव व भृगु ऋषी : आकाश तुपे, सुशीला व जानकीबाई : गौरी देशपांडे, नावाडी व रामणराव : हिमांशू कुदले, शिर्के : अभिमन्यू पाठक, सूर्यवंशी : तन्मय सूर्यवंशी, विनायकराव व चोर : अभिषेक लवाटे, गोसावी : पार्थ गरुड, संगीत नाटककार : दर्शन जोशी, बलराम व शामराव : शंतनू माने, राधा : तन्वी बोर्लीकर, गौळण : ऋतुजा मोरे, साक्षी परदेशी, गावकरी : दीप्ती थोरात, यश मेंगडे.
----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com