श्री महालक्ष्मी साळूबाईचा उद्यापासून शिमगोत्सव

श्री महालक्ष्मी साळूबाईचा उद्यापासून शिमगोत्सव

Published on

मिरजोळीत उद्यापासून शिमोत्सव
चिपळूण, ता. १ : मिरजोळी येथील ग्रामदेवता श्री देवी महालक्ष्मी-साळूबाईच्या शिमगोत्सवाला तीन मार्चपासून प्रारंभ होणार आहे. त्याची जय्यत तयारी मिरजोळी गावात केली असून यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
सोमवारी (ता. २) रात्री १० वाजता श्री देवी महालक्ष्मी साळूबाई मंदिर परिसरातील सहाणेवर पालखी सजवली जाणार असून ३ मार्चला पहाटे ५ वाजता मंदिराजवळ भद्रेचा होम झाल्यावर मंदिरापासून पवारवाडीपर्यंत मिरवणुकीने पालखीचे आगमन होणार आहे. त्यानंतर प्रथम तीन मानकरी घरातील आरत्या घेतल्यावर मिरवणुकीने पालखी दलवाई मोहल्ला मार्गे कोंढे सीमेवर जाताना त्या परिसरातील आरत्या घेणार आहे.
त्यानंतर चौथ्या, पाचव्या, सहाव्या, सातव्या मानकरी घरातील आरती घेत दत्तवाडी येथे आगमन व येथील श्री दत्त मंदिर स्टेजवर बसून ग्रामस्थ व भाविकांच्या आरत्या घेतल्या जाणार आहेत. त्यानंतर पालखी घरोघरी जाणार आहे. ८ मार्चला उक्ताड येथून मिरवणुकीने पालखीचे मिरजोळी येथे आगमन होणार असून रात्री १२ नंतर मंदिर परिसरातील सहाणेवर लळिताने शिमगोत्सवाची सांगता होईल.

Marathi News Esakal
www.esakal.com