धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे
वेळागर किनारी स्वच्छता

धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे वेळागर किनारी स्वच्छता

Published on

27979

धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे
वेळागर किनारी स्वच्छता
आरोंदा, ता. १ ः डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा (ता. अलिबाग) यांच्या वतीने आज संपूर्ण देशभर स्वच्छता अभियान राबविले जात आहे. याचाच एक भाग म्हणून शिरोडा वेळागर समुद्रकिनारी परिसरामध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात आले. डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या पुण्यतिथी निमित्त हा उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी शिरोडा सरपंच लतिका रेडकर, माजी उपसभापती सिद्धेश परब, नूतन जिल्हा परिषद सदस्य प्रीतेश राऊळ, पंचायत समिती सदस्य योगिता परब, ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग नाईक, शिरोडा पोलिस दूरक्षेत्राचे प्रसाद कदम, पोलिसपाटील संदीप मोरजकर, आजू अमरे तसेच सिंधुदुर्ग बैठकीमधील श्री सदस्य उपस्थित होते. सरपंच रेडकर, प्रीतेश राऊळ यांनी या स्वच्छता मोहिमेचे कौतुक केले. शिरोडा, वेंगुर्ले, सावंतवाडी, बांदा, माणगाव, तळवडे, पिंगुळी, ओरोस येथील श्री सदस्यांनी सहभागी होत वेळागर समुद्रकिनारी स्वच्छता मोहीम राबविली. यात परिसरातील प्लास्टिक, काच बाटल्या, टाकाऊ वस्तु, कपडे, निरुपयोगी पदार्थ, कचरा एकत्रित गोळा करून तो ग्रामपंचायत शिरोडा येथील डम्पिंग ग्राउंडमध्ये टाकण्यात आला. शिरोडा ग्रामपंचायत, सामाजिक संस्था, ग्रामस्थ यांनीही या अभियानात सहभाग घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com