रत्नागिरी-करुणाष्टक, रामरक्षा स्पर्धेला उदंड प्रतिसाद

रत्नागिरी-करुणाष्टक, रामरक्षा स्पर्धेला उदंड प्रतिसाद

Published on

rat1p42.jpg-
27984
रत्नागिरी : कुवारबाव पंचक्रोशी ब्राह्मण सभेतर्फे दासनवमीनिमित्त आयोजित पठण स्पर्धेतील विजेते विद्यार्थी. मागे अनंत आगाशे, रवींद्र इनामदार, वंदना घैसास, रवींद्र रानडे, विलास कुलकर्णी यांच्यासमवेत परीक्षक.
---------
करुणाष्टक, रामरक्षा स्पर्धेला प्रतिसाद
कुवारबाव ब्राह्मण सभा; दासनवमीनिमित्त आयोजन
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ३ : कुवारबाव पंचक्रोशी ब्राह्मण सभेने दासनवमीनिमित्त आयोजित केलेल्या करुणाष्टक व रामरक्षा पठण स्पर्धेला पंचक्रोशीतील शालेय विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद मिळाला. १६० विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत भाग घेऊन सादरीकरण केले. विजेत्यांना अध्यक्ष अनंत आगाशे, उपाध्यक्ष रवींद्र इनामदार, सचिव रवींद्र रानडे, खजिनदार विलास कुलकर्णी, परीक्षक वंदना घैसास व शिक्षिका जुई पाटणकर यांच्या हस्ते गौरवण्यात आले.
दासनवमीनिमित्त गेली अनेक वर्षे कुवारबाव पंचक्रोशी ब्राह्मण सभेच्या नाचणे येथील यशवंत हरी गोखले भवनात स्पर्धा आयोजित केली जात आहे. यामध्ये ब्राह्मण व हिंदूधर्मीय विद्यार्थ्यांना सहभाग घेता येतो. यंदा या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विजेत्यांची नावे (प्रथम, द्वितीय, तृतीय या क्रमाने) ः करुणाष्टक (१ ते १०) गट १- आद्या सोहनी, सचिन कदम, वेदांत चव्हाण, गट २- हर्षा कळंबटे, स्वामिनी बिर्जे, उर्वी जोशी, करुणाष्टक (११ ते २०) गट ३- शमिका बाईत, चिन्मयी चव्हाण, रोशनी होसोली, गट ४- आरुष पंडित, अर्णव शिंदे, यज्ञेश कदम, गट ५- स्वामिनी सावंतदेसाई, दुर्वेश नेरकर, कश्यप कांबळे, गट ६ (२१ ते ३०)- सारा सुर्वे, आर्ची चव्हाण, त्रिशा गुरव, गट ७- अथर्व शिर्के, दिव्यांशी कळंबटे, अनुप कळंबटे. रामरक्षा- गौरांग गद्रे, आयुष जोशी, सोहम भागवत व श्रुती शिंदे, गट ९- आभा घारपुरे, तीर्था पंडित, मृण्मयी येझरे, गट १०- स्वराज्ञी सरपोतदार, अर्णव दाते, उत्कर्ष शेटे, गट ११- श्रेयसी हातिसकर, जान्हवी कळंबटे, प्रसन्न पुरोहित.
वंदना घैसास, दीप्ती आगाशे, जयराम आठल्ये, सुरेखा जोशी, स्नेहा जोशी, विद्याधर चिंचळकर, मुग्धा कुळकर्णी, मधुरा आचार्य, श्रद्धा जोशी, अर्चना जोशी, उर्मिला पटवर्धन, अर्चना देवधर, अविनाश फाटक यांनी स्पर्धेचे परीक्षण केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com