कोळोशीत रस्त्याच्या कामाला प्रारंभ
27999
कोळोशीत रस्त्याच्या कामाला प्रारंभ
नांदगाव ः पालकमंत्री नीतेश राणे यांच्या माध्यमातून कोळोशी विठ्ठल मंदिर ते गावठणवाडीमार्गे चर्मकार वाडीकडे जाणारा रस्ता डांबरीकरण कामाचे भूमिपूजन जिल्हा परिषद सदस्य संतोष पारकर यांच्या हस्ते झाले. शासनाच्या अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीचा विकास करणे या योजनेअंतर्गत हे काम मंजूर झाले आहे. या रस्त्यासाठी पालकमंत्री नीतेश राणे यांच्या पाठपुराव्याने निधी उपलब्ध झाला आहे. याबाबत ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले. यावेळी नांदगाव पंचायत समिती सदस्या हर्षदा वाळके, भाजपाचे तालुका सरचिटणीस व कणकवली खरेदी-विक्री संघाचे संचालक पंढरी वायंगणकर, सरपंच गुरुनाथ आचरेकर, उपसरपंच अतुल गुरव, ग्रामपंचायत सदस्य व शक्तिकेंद्र प्रमुख सुशील इंदप, सुचिता पोकळे, मीनाक्षी जाधव, ग्रामपंचायत अधिकारी मंगेश राणे, आप्पा इंदप, विद्याधर खोत, उत्तम सावंत, चंद्रकांत इंदप, सुभाष इंदप, दाजी इंदप, मंगेश इंदप उपस्थित होते.
....................
28000
निबंध लेखन स्पर्धेत नातू यांचे यश
बांदा ः ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरू तेग बहादूर यांच्या ३५० व्या शहिदी समागम कार्यक्रमाच्या अनुषंगाने माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या उपसंचालक (माहिती), विभागीय माहिती कार्यालय, कोल्हापूर यांच्यावतीने नुकतीच ‘गुरू तेग बहादूर यांचे जीवनकार्य’ विषयावर खुली निबंध लेखन स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत येथील नट वाचनालयाचे सहाय्यक ग्रंथपाल सुनील नातू यांनी उत्कृष्ट निबंध लेखन करत तृतीय क्रमांक पटकावला. त्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. या यशाबद्दल त्यांचे बांदा परिसरातून तसेच साहित्य व वाचनालय क्षेत्रातून अभिनंदन करण्यात येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

