कोचरे दत्त मंदिर संरक्षक भिंत, 
रस्ता दुरुस्तीच्या कामास प्रारंभ

कोचरे दत्त मंदिर संरक्षक भिंत, रस्ता दुरुस्तीच्या कामास प्रारंभ

Published on

28013

कोचरे दत्त मंदिर संरक्षक भिंत,
रस्ता दुरुस्तीच्या कामास प्रारंभ

म्हापण, ता. १ ः कोचरे येथील दत्त मंदिर जेटी जवळील रस्त्याची व संरक्षण भिंतीची दुरुस्ती व मजबुतीकरण कामाचे भूमिपूजन आज शिवसेना, भाजप महायुतीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आले. महाराष्ट्र मेरीटाईम्स बोर्डाच्या राज्यस्तरीय योजनेअंतर्गत सुमारे ५५ लाख रुपये निधी या कामासाठी मंजूर झाला आहे. पालकमंत्री नीतेश राणे यांच्या माध्यमातून व आमदार दीपक केसरकर यांच्या विशेष प्रयत्नातून हे काम मंजूर करण्यात आले. या कामाचे भूमिपूजन वेंगुर्ले भाजप तालुकाध्यक्ष पप्पू परब यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद सदस्या यज्ञा साळगावकर, परुळे पंचायत समिती सदस्य सचिन देसाई, म्हापण पंचायत समिती सदस्य विष्णू उर्फ आप्पा फणसेकर, कोचरा सरपंच योगेश तेली, उपसरपंच गुरुनाथ शिरोडकर, म्हापण शिवसेना विभागप्रमुख देवदत्त साळगावकर, सदस्य अनिल सुतार, म्हापण माजी सरपंच व सोसायटी चेअरमन आनंद गावडे, आपा गोसावी, शिवसेना शाखाप्रमुख भाई खवणेकर, माजी सदस्य बाबल गवंडे, आबा कोचरेकर, सदस्या प्रगती राऊळ, स्वरा हळदणकर, उपेंद्र रावले, राजू हंजनकर, जान्हवी तेली, चित्रांग साळगावकर, शैलेश तेली, ठेकेदार पुष्पराज परब उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com