स्वच्छता अभियानातून राष्ट्रहिताचा संदेश
28030
स्वच्छता अभियानातून राष्ट्रहिताचा संदेश
धर्माधिकारी प्रतिष्ठानचा उपक्रम; जिल्ह्यात २३ टन कचरा संकलित
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. १ : डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान (रेवदंडा) यांच्यावतीने संपूर्ण देशात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. याच अभियानाचा एक भाग म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाच महत्त्वाच्या ठिकाणी भव्य स्वच्छता मोहीम राबवून सुमारे २३ टन ५६० किलो कचरा संकलित करण्यात आला.
पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी आणि रायगड भूषण डॉ. सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आज सकाळी ७.३० वाजल्यापासून या मोहिमेला सुरुवात झाली. या अभियानांतर्गत जिल्ह्यातील पाच प्रमुख ठिकाणी श्रीसदस्यांनी श्रमदान केले. यात मालवण ग्रामीण रुग्णालय परिसर ४६० श्रीसदस्यांनी स्वच्छ करत ४ टन कचरा गोळा केला. या सामाजिक उपक्रमात नगराध्यक्षा ममता वराडकर, उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, आरोग्य सभापती पूनम चव्हाण, माजी नगरसेविका जयमाला मयेकर, वैद्यकीय अधिकारी, पोलिस प्रशासन आणि विविध सरकारी कार्यालयांचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. दरम्यान,डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे केवळ स्वच्छताच नव्हे, तर आरोग्य शिबिरे, रक्तदान, वृक्षारोपण, जलपुनर्भरण आणि शैक्षणिक साहित्य वाटप यांसारखे अनेक उपक्रम राबवले जातात. मानवी मूल्यांची जोपासना आणि राष्ट्रहित जोपासण्याच्या उद्देशाने ही सेवा अविरतपणे सुरू आहे.
---
इतर ठिकाणीही स्वच्छता
जानवली पशुवैद्यकीय दवाखाना ३९० श्रीसदस्यांनी ७ टन कचरा, शिरोडा वेळागर किनारी ३८४ श्रीसदस्यांनी १६ टन ६०० किलो, देवगड पवनचक्की व गार्डन परिसर १०४ श्रीसदस्यांनी ३१० किलो, देवगड किनारी १४७ श्रीसदस्यांनी १६५० किलो कचरा गोळा केला. या मोहिमेद्वारे एकूण १७,८४४ चौरस मीटर परिसर आणि २ किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा पूर्णपणे स्वच्छ केला. या कामात जिल्ह्यातील एकूण २७ बैठकांमधील १४८५ श्री सदस्यांनी सहभाग नोंदवला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

