दांडीतील ‘त्या’ वीजवाहिनीची आचरेकर यांच्याकडून पाहणी
28037
दांडीतील ‘त्या’ वीजवाहिनीची
आचरेकर यांच्याकडून पाहणी
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. १ : शहरातील दांडी किनाऱ्यावरील दांडेश्वर मंदिर ते पद्मगड दरम्यान खाली आलेल्या धोकादायक वीजवाहिनीची नगरसेविका तथा महिला व बालकल्याण सभापती अन्वेषा आचरेकर यांनी महावितरण विभागाच्या अभियंत्यांसह पाहणी केली. ८ ते १० दिवसांत ही वाहिनी सुरक्षित उंचीवर नेली जाईल, अशी ग्वाही महावितरणने दिली.
स्थानिक व्यावसायिकांनी या गंभीर समस्येकडे आचरेकर यांचे लक्ष वेधले होते. आचरेकर यांनी महावितरणचे अभियंता सचिन मेहेत्रे यांना सोबत घेऊन दांडी किनाऱ्याची पाहणी केली. आगामी पर्यटन हंगाम पाहता किनाऱ्यावर पर्यटकांची मोठी गर्दी होणार आहे, तत्पूर्वी ही वाहिनी सुरक्षित उंचीवर नेणे आवश्यक असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. अभियंता मेहेत्रे यांनी, वीज वाहिनीच्या खांबांबाबत सध्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून काम सुरू आहे. संबंधित कंत्राटदाराने पुढील १० दिवसांत ही वीजवाहिनी सुरक्षित उंचीवर नेण्याचे आश्वासन दिले आहे. पर्यटक आणि स्थानिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देऊन हे काम तातडीने पूर्ण केले जाईल, असे सांगितले. यावेळी स्थानिक व्यावसायिक आणि मच्छीमार बांधव उपस्थित होते. प्रशासनाच्या या सकारात्मक निर्णयामुळे दांडी परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

