डिजिटल शिक्षणासाठी ‘प्रज्ञानी’ उपक्रम महत्‍वपूर्ण

डिजिटल शिक्षणासाठी ‘प्रज्ञानी’ उपक्रम महत्‍वपूर्ण

Published on

28183

डिजिटल शिक्षणासाठी ‘प्रज्ञानी’ महत्‍वपूर्ण

प्रवीण शेवडे ः व्हर्च्युअल क्लासरूमकडे वाटचाल

कणकवली, ता. ३ : जिल्ह्यातील सर्व शाळांतील विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षणाबाबत प्रभावी मार्गदर्शन मिळावे तसेच स्पर्धा परीक्षा व शिष्यवृत्ती परीक्षांसाठी योग्य दिशा मिळावी, या उद्देशाने ‘प्रज्ञानी’ हा महत्‍वपूर्ण शैक्षणिक उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाचा लाभ जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना निश्चितच होईल, असा विश्वास शिक्षणतज्ज्ञ तथा ‘प्रज्ञानी’ उपक्रमाचे प्रणेते प्रवीण शेवडे यांनी व्यक्त केला.
कणकवली तालुका व्यापारी संघातर्फे शहरातील शाळा क्रमांक ३ येथे ‘प्रज्ञानी’ उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी शेवडे बोलत होते. उद्‌घाटन प्रसंगी यावेळी गट शिक्षणाधिकारी किशोर गवस, तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष दीपक बेलवलकर, उपाध्यक्ष राजन पारकर, ज्येष्ठ पत्रकार अशोक करंबेकर, राजा राजाध्यक्ष, मुख्याध्यापिका अक्षया राणे, शिक्षिका नेहा सामंत, राजेंद्र परब, प्रतिभा कोतवाल, संतोष घाडीगावकर, ज्योत्स्ना चव्हाण, संजय तांबे, शर्मिला चव्हाण, अर्चना राऊत, अश्विनी साटम, रूपाली डोईफोडे, सुरेखा सावंत उपस्थित होते. यावेळी गट शिक्षणाधिकारी किशोर गवस, संजय मोरे यांनी ‘प्रज्ञानी’ उपक्रमाचे कौतुक केले. दीपक बेलवलकर यांनी स्वागत केले. शिक्षक निवृत्ती गुरव यांनी सूत्रसंचालन केले. राजा राजाध्यक्ष यांनी आभार मानले.
---
सर्व शाळांमध्ये उपक्रम राबवू!
प्रवीण शेवडे म्हणाले, ‘‘डिजिटल विश्वातील नवसंकल्पनांशी विद्यार्थ्यांना जोडण्याचा मानस आहे. व्हर्च्युअल क्लासरूम ही पुढील पायरी असली तरी शिष्यवृत्ती व स्पर्धा परीक्षांसाठी पुणे व मुंबईतील शिक्षणतज्ज्ञांचे मार्गदर्शन ऑनलाईन आणि ऑनसाईट या द्विसंगम पद्धतीने देण्याचा ‘प्रज्ञानी’ उपक्रमाचा उद्देश आहे. जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये हा उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com