बोर्डवे येथे रेल्वेस्थानकासाठी प्रयत्न करू ः आंबार्डेकर
28187
बोर्डवे येथे रेल्वेस्थानकासाठी
प्रयत्न करू ः आंबार्डेकर
चंद्रहास राणे यांचे उपोषण मागे
कणकवली, ता. ३ : बोर्डवे येथे रेल्वेस्थानक होण्याबाबत तत्काळ पत्रव्यवहार केला जाईल. तसेच रेल्वे स्थानक उभारणीबाबत सहा महिन्यांत कार्यवाही होईल, अशी ग्वाही कोकण रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी शैलेश आंबार्डेकर यांनी उपोषणकर्त्यांना दिली. त्यामुळे बोर्डवे रेल्वे फाटक (ता.कणकवली) येथे चंद्रहास राणे आणि इतर ग्रामस्थांनी सुरू केलेले उपोषण सोमवारी सायंकाळी मागे घेण्यात आले.
बोर्डवे येथे कोकण रेल्वेचे स्थानक व्हावे, यासाठी ओसरगाव येथील सामाजिक कार्यकर्ते चंद्रहास राणे यांच्यासह ओसरगाव आणि बोर्डवेतील काही ग्रामस्थांनी तीन दिवस उपोषण सुरू ठेवले होते. या उपोषणकर्त्यांना माजी खासदार विनायक राऊत, कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांची भेट देऊन पाठिंबा दिला होता. दरम्यान, काल सायंकाळी सहाला कोकण रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी शैलेश आंबार्डेकर यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली. यावेळी बोर्डवे येथे स्थानक होण्याबाबत तत्काळ भारतीय रेल्वे मंत्र्यांशी आणि संबधित अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार करू. तसेच सहा महिन्यांत स्थानक उभारणीबाबतची कार्यवाही सुरू केली जाईल, अशीही ग्वाही त्यांनी दिली. या लेखी आश्वासनानंतर चंद्रहास राणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी उपोषण मागे घेतले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

