स्वामी समर्थ पालखीचे मंडणगडात स्वागत
- rat३p३.jpg-
२६O२८१९१
मंडणगड: श्रीस्वामी समर्थांच्या आरतीमध्ये तल्लीन झालेले मंडणगड मधील भक्तगण.
----
स्वामी समर्थ पालखीचे मंडणगडात स्वागत
सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. ३ ः अक्कलकोट निवासी श्रीदेव श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या पालखीचे मंडणगड शहरात तालुक्यातील स्वामी भक्तांकडून उत्साहात व भक्तिभावाने स्वागत करण्यात आले. पालखी आगमनानिमित्त शहरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.
पालखी स्वागतासाठी नगरपंचायत व्यापारी संकुल इमारतीसमोर भव्य मंडप उभारण्यात आला होता. पालखी मंडपात आल्यानंतर पालखीतील पादुकांचे विधीवत पूजन करण्यात आले. त्यानंतर भाविकांनी पालखी व पादुकांचे दर्शन घेतले. दर्शनासाठी शहरासह परिसरातील भाविकांनी मोठी गर्दी केली. नगरपंचायत व्यापारी संघटनेच्या वतीने पादुका दर्शनासाठी आलेल्या सर्व भक्तांसाठी अन्नदान व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या समारोपावेळी भाविकांनी स्वामी समर्थांची आरती म्हणत परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. आरतीच्या सुरांनी वातावरण सकारात्मक ऊर्जेने भारावून गेले. पालखीसमवेत आलेल्या सेवेकऱ्यांचीही उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. मंडणगड शहरात स्वामी समर्थांच्या भेटीचा हा भक्तिमय सोहळा गेली २९ वर्षे अविरतपणे साजरा केला जात असून यंदाही तो मोठ्या उत्साहात पार पडला. या प्रसंगी तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. नगरपंचायत व्यापारी संघटनेचे अध्यक्ष रणवीर लेंडे, वैभव कोकाटे, रूपेश साळुंखे, शेखर पारेख, श्रीपाद कोकाटे, राहुल कोकाटे, प्रबोध कोकाटे, वीरेंद्र घोसाळकर, प्रज्योत गांधी, ओंकार लेंडे, राजेश पारेख, नरेश माटवणकर, सुहास घोलप, सतीश गोठल, सतीश बेर्डे, हेमंत दिवेकर, विशाल कोकाटे, शिवप्रसाद कामेरीकर यांच्यासह अन्य व्यापाऱ्यांनी परिश्रम घेतले.

