जिज्ञासेमुळे नवनिर्मितीची प्रेरणा
swt33.jpg
28219
कट्टा ः वराडकर हायस्कूल येथे विज्ञान प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
जिज्ञासेमुळे नवनिर्मितीची प्रेरणा
सुनील नाईक ः कट्टा हायस्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शन
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. ३ : जिज्ञासा ही शोधाची जननी आहे. जेव्हा मुले स्वतःच्या हाताने काही नवीन घडवतात, तेव्हा ती नवनिर्मितीतून बोलकी होते, असे प्रतिपादन कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव सुनील नाईक यांनी कट्टा येथे केले. जागतिक विज्ञान दिनानिमित्त प्रशालेत आयोजित केलेल्या विज्ञान प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
या कार्यक्रमाचे उद्घाटन स्कूल कमिटी अध्यक्ष सुधीर वराडकर, माजी विद्यार्थी सुधाकर राणे आणि बाबी पवार यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी विज्ञानातील विविध संकल्पनांवर आधारित ७४ प्रतिकृती सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक प्रयोगातून सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला. यामध्ये तीन गटांत सादरीकरण झाले. पाचवी गट १३ प्रतिकृती, सहावी-सातवी गट ३१ प्रतिकृती, आठवी-नववी गट ३० प्रतिकृती यांचा समावेश होता. परीक्षण विणा शिरोडकर, प्रकाश कानुरकर, अमिषा परब यांनी केले.
विज्ञान प्रदर्शन निकाल असा ः पाचवी-रुद्र भाट, डिंपल परब, सोहम मेस्त्री, कार्तिक ढोलम, सहावी व सातवी-श्लोक चांदरकर, गौरांग मेस्त्री, महावीर कांबळे, स्वस्तिक मांजरेकर, साईश थवी, गार्गी कांबळी, आर्या वायंगणकर. आठवी व नववी-तेजस मेस्त्री, निखिलेश मेस्त्री, संचित गावडे, अभिजित खोत, संदेश भोसले, यामिनी म्हाडगुत, सिध्दी महाभोज, चंदना शेटये, श्रुती फोपळे, धनश्री आचरेकर, मयुरी चिरमुले, ओंकार रोहिलकर, प्रांजय वाईरकर. पर्यवेक्षक महेश भाट यांनी आभार मानले. या उपक्रमासाठी विज्ञान शिक्षक भूषण गावडे, शिक्षिका सिमरन चांदरकर आणि सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. मुख्याध्यापिका देवयानी गावडे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
यावेळी संस्थेचे पदाधिकारी, विश्वस्त निवृत्त कर्नल शिवानंद वराडकर, ॲड. एस. एस. पवार, अध्यक्ष अजयराज वराडकर, उपाध्यक्ष आनंद वराडकर, खजिनदार रवींद्रनाथ पावसकर, सर्व संचालक मंडळाचे अभिनंदन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

