''खासदार नारायण राणे चषक'' स्पर्धा बांद्यात ८ एप्रिलपासून

''खासदार नारायण राणे चषक'' स्पर्धा बांद्यात ८ एप्रिलपासून

Published on

swt34.jpg
28220
बांदा ः पत्रकार परिषदेत माहिती देताना जावेद खतीब, बाळू सावंत व इतर.

‘खासदार नारायण राणे चषक’
स्पर्धा बांद्यात ८ एप्रिलपासून
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. ३ ः खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त बांदा येथे ‘खासदार नारायण राणे चषक’ ही क्रिकेट स्पर्धा ८ ते १२ एप्रिल या कालावधीत येथील पाटेश्वर मैदानावर खेळविण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी पत्रकार परिषदेत दिली.
या स्पर्धेचे प्रथम पारितोषिक रुपये १ लाख तर द्वितीय पारितोषिक रुपये ५० हजार ठेवले आहे. याशिवाय बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर तसेच इतर उत्तेजनार्थ बक्षिसांसह खासदार चषक प्रदान करण्यात येणार आहे. ही स्पर्धा ‘एक गाव-एक संघ’ या संकल्पनेवर आधारित असून प्रत्येक संघात दोन आयकॉन खेळाडूंचा समावेश असणार आहे. माजी उपसरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य जावेद खतीब व बाळू सावंत यांनी स्पर्धेबाबत सविस्तर माहिती दिली. यावेळी गुरुनाथ सावंत, ज्ञानेश्वर सावंत, दीपक सावंत, श्याम मांजरेकर, सुनील धामापूरकर, साईनाथ धारगळकर, राजा सावंत, नीलेश नाटेकर, संदीप बांदेकर, आपा धामापूरकर, तुषार धामापूरकर, मंदार धामापूरकर, प्रवीण नाटेकर, बंटी गवंडळकर, बाबा गाड आदी क्रिकेटप्रेमी उपस्थित होते. या स्पर्धेसाठी पक्षाचे विविध वरिष्ठ नेते उपस्थित राहून खेळाडूंना शुभेच्छा देणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com