कवठणीतील आरोग्य शिबिरात
१०० जणांची मोफत चिकित्सा

कवठणीतील आरोग्य शिबिरात १०० जणांची मोफत चिकित्सा

Published on

28342

कवठणीतील आरोग्य शिबिरात
१०० जणांची मोफत चिकित्सा

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ३ ः येथील सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठान आणि कवठणी ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने कवठणी गावात रविवारी (ता. १) आयोजित निःशुल्क आरोग्य चिकित्सा शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिरात सुमारे १०० गरजू रुग्णांची तपासणी करून त्यांना औषधे देण्यात आली. 
कवठणी माऊली विद्या मंदिरात घेतलेल्या या शिबिराच्या उद्‍घाटनप्रसंगी जिल्हा परिषदेचे सदस्य सुदन कवठणकर, पंचायत समितीचे सदस्य उदय पारिपत्ये, सरपंच अजित कवठणकर, उपसरपंच श्रद्धा कवठणकर, ग्रामपंचायत अधिकारी राजन नाईक, ग्रामपंचायत सदस्य अजय सावंत, सावंतवाडी जीवनरक्षा हॉस्पिटलचे डॉ. शंकर सावंत, सिंधुमित्र प्रतिष्ठानचे डॉ. प्रवीणकुमार ठाकरे, मधुमेह व हृदयरोगतज्ज्ञ डॉ. नंदादीप चोडणकर, नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. विशाल पाटील, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. मुग्धा ठाकरे, माणगाव रुग्णालयाच्या डॉ. स्नेहल परब, डॉ. स्वप्नील परब,  कर्मचारी संकेत कवठणकर, समुदाय आरोग्य अधिकारी प्रमिला यमगेकर आदी उपस्थित होते. प्रयोगशाळा तंत्रज्ञ प्रशांत कवठणकर यांनी रक्तशर्करा तपासणी केली. रुग्णांना मोफत औषधे दिली. या उपक्रमाबद्दल सरपंच कवठणकर व ग्रामस्थांनी प्रतिष्ठानचे आभार मानले. शिबिराचे नियोजन प्रतिष्ठानचे कार्यकर्ते भार्गवराम शिरोडकर, श्रीकांत दळवी, गुरुनाथ राऊळ, अँड्र्यू फर्नांडिस, भगवान रेडकर, संतोष नाईक, दीपक गावकर, सिद्धेश मणेरीकर यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com