चर्मकार उन्नती मंडळाची वाटचाल प्रेरक

चर्मकार उन्नती मंडळाची वाटचाल प्रेरक

Published on

swt310.jpg
28217
कुडाळ ः सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळ समाजाच्या वर्धापन दिनाचे उद्घाटन करताना नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर व इतर मान्यवर.

चर्मकार उन्नती मंडळाची वाटचाल प्रेरक
प्राजक्ता बांदेकर ः कुडाळात ४२ वा वर्धापन सोहळा उत्साहात
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ३ ः सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळ समाजासाठी राबवीत असलेले विविध उपक्रम आणि त्यांचे समाजकार्य कौतुकास्पद आहे. या मंडळाची आजवरची वाटचाल सर्वांसाठीच प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन कुडाळच्या नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांनी केले.
येथील मराठा समाज सभागृहात आयोजित मंडळाच्या ४२ व्या वर्धापन दिन व विशेष सन्मान सोहळ्यात सौ. बांदेकर बोलत होत्या. व्यासपीठावर संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुजित जाधव, प्रा. नितीन बांबर्डेकर, जिल्हा सरचिटणीस चंद्रसेन पाताडे, कोषाध्यक्ष नामदेव जाधव, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र चव्हाण, उत्तम चव्हाण, माजी जिल्हाध्यक्ष नंदन वेंगुर्लेकर, सहसचिव बाबुराव चव्हाण, सुभाष बांबुळकर, महिला सदस्या प्रिया आजगावकर, मयुरी चव्हाण, माजी जिल्हा सरचिटणीस श्रीराम चव्हाण, उदय शिरोडकर, जिल्हा सदस्य नरसू रेडकर, आनंद जाधव, प्रसाद पाताडे, प्रवक्ता सुनील जाधव, सल्लागार प्रदीप पवार, पी. बी. चव्हाण, कुडाळ तालुकाध्यक्ष संतोष चव्हाण, कणकवली तालुकाध्यक्ष महेंद्र चव्हाण, मालवण तालुकाध्यक्ष हरेश चव्हाण, सावंतवाडी तालुकाध्यक्ष विनायक चव्हाण, माजी अध्यक्ष गणेश म्हापणकर, कणकवली सचिव मंगेश आरेकर, मालवण सचिव संभाजी कोरे, वेंगुर्ले सचिव महेश चव्हाण, संघटक गुरुप्रसाद चव्हाण, युवा प्रमुख प्रकाश वाघेरकर, शिक्षण प्रमुख प्रशांत चव्हाण, साहित्य प्रमुख सुरेश पवार, व्यवसाय प्रशिक्षण सहप्रमुख रामदास चव्हाण, योजना प्रमुख लवेंद्र किंजवडेकर, व्यवसाय प्रशिक्षण प्रमुख अनिल चव्हाण, भवन सहप्रमुख राजन वालावलकर, युवा मालवण अध्यक्ष मनोहर पाताडे, युवा कणकवली अध्यक्ष महेंद्र देवरुखकर, युवा वेंगुर्ला अध्यक्ष रोहित वेंगुर्लेकर, वधू-वर समिती सहप्रमुख सुनील पाताडे, युवा सहप्रमुख हेमंत फोंडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
या सोहळ्याचे औचित्य साधून समाजात राजकीय व सामाजिक क्षेत्रात ठसा उमटवणाऱ्या भगिनींचा विशेष गौरव करण्यात आला. यामध्ये कणकवली पंचायत समिती सदस्य महेश्वरी चव्हाण, कणकवली नगरपंचायत नगरसेविका दीपिका जाधव सरमळकर यांचा समावेश होता. प्रलंबित संत रविदास भवनासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन सौ. बांदेकर यांनी दिले.
प्रा. नितीन बांबर्डेकर यांनी ‘मागोवा संघटनेचा’ या विषयावर विवेचन केले. माजी जिल्हा सरचिटणीस श्रीराम चव्हाण यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. जिल्हा सरचिटणीस चंद्रसेन पाताडे यांनी सूत्रसंचालन केले. रामदास चव्हाण यांनी आभार  मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com