चिपळूण-करंजेश्वरीने शोधली दोन तासात ४४ शेरणे

चिपळूण-करंजेश्वरीने शोधली दोन तासात ४४ शेरणे

Published on

rat3p1५.jpg-
28242
चिपळूण ः पेठमाप येथील नदीकिनारी करंजेश्वरीने शोधलेले शेरणे भाविकांना देताना.
rat3p1४.jpg-
28241
पेठमाप नदीकिनारी शेरणे उत्सव कार्यक्रमाला झालेली अलोट गर्दी.

करंजेश्वरीने शोधली दोन तासात ४४ शेरणे
शिमगोत्सव उत्साहात ; वाशिष्ठीच्या किनारी अलोट गर्दी
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ३ : शहरातील पेठमाप येथील निसर्गरम्य वाशिष्ठी नदीकिनाऱ्यावर सोमवारी (ता. २) सायंकाळी ४ वाजल्यापासून शेरणे शोधण्याचा कार्यक्रम दोन तास चालला. पेठमाप नदीकिनारी जमिनीत पुरलेल्या १२३ पैकी ४४ शेरणे काढण्यात आली.
गोविंदगडच्या पायथ्याशी असलेल्या करंजेश्वरी मंदिरामध्ये शिमगोत्सवाची अनोखी परंपरा आहे. ज्या भाविकांना दिलेला नवस बोलायचा असतो त्यांनी शेरणे काढण्याच्या एक दिवस आधी पिवळ्या कापडामध्ये नारळ आणि नावाची चिठ्ठी टाकून हे शेरणे मैदानातील मातीत पुरून ठेवतात. करंजेश्वरी आणि सोमेश्वर यांच्या पालखीच्या पुढे चालणार निशाण जमिनीमध्ये पुरलेले शेरणे शोधून काढते. हा सोहळा पाहण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी झाली होती. सोमवारी सायंकाळी ४ वा. देवस्थानच्या दोन्ही पालख्या पेठमाप येथील वाशिष्ठी नदीकिनारी मिरवणुकीने दाखल झाल्या. १२३ पैकी ४४ शेरणे काढण्यात आली. यानिमित्त पेठमाप परिसराला जत्रेचे स्वरूप आले होते. सायंकाळी साडेसात नंतर दोन्ही पालख्यांनी पेठमापहून गोवळकोटकडे प्रयाण केले. या शिमगोत्सवातील भद्रेचा होम सायंकाळी सात वाजता लावण्यात आला. शेरणे कार्यक्रमावेळी पोलिस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवला होता. बाजारपुलावरील व अन्य वाहतूक व्यवस्थाही चोख ठेवण्यात आली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com