अवैध वाळूवाहू डंपर पकडला

अवैध वाळूवाहू डंपर पकडला

Published on

28251

अवैध वाळूवाहू डंपर पकडला

मालवण महसूल पथकाची आडारीत कारवाई


सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. ३ : आडारी (ता.मालवण) परिसरात अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीविरोधात महसूल विभागाने कारवाई केली. रविवारी (ता.१) सायंकाळी सातच्या सुमारास अनधिकृतपणे वाळू वाहतूक करणारा डंपर महसूल पथकाने ताब्यात घेतला.
मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, तहसीलदार गणेश लव्हे यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभागाच्या पथकाने आडारी परिसरात सापळा रचला होता. सायंकाळी सातच्या सुमारास संबंधित डंपर (जीए ०३ एएच ०८६१) संशयास्पदरीत्या जात असताना पथकाने त्याला थांबवले. तपासणी केली असता यामध्ये कोणत्याही अधिकृत परवान्याशिवाय वाळूची वाहतूक केली जात असल्याचे निष्पन्न झाले. पथकाने तत्काळ डंपर जप्त करून पुढील कारवाईसाठी ताब्यात घेतला. ही कारवाई महसूल विभागाच्या विशेष पथकातील मंडल अधिकारी अजय परब, सुदर्शन अलकुटे, ग्राम महसूल अधिकारी पोपट गुरव, वाहनचालक विलास बागवे या कर्मचाऱ्यांनी केली.
......................
वाळू माफियांचे धाबे दणाणले
तालुक्यात ठिकठिकाणी अनधिकृत वाळू उपसा करणाऱ्यांविरोधात महसूल विभागाने आता कंबर कसली आहे. अशाप्रकारची अवैध वाहतूक करणाऱ्यांवर यापुढेही कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. या कारवाईमुळे अवैध वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com