मालवण मेढा येथील गटाराच्या कामात तडजोड खपवून घेणार नाही
28265
मेढा येथील गटारीचे काम
दर्जेदार करा ः बापर्डेकर
बांधकाम सभापतींतर्फे सूचना
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. ३ : शहरातील मेढा भागात मुरलीधर मंदिर ते राम मंदिर या मार्गावर सध्या काँक्रिट गटाराचे बांधकाम वेगाने सुरू आहे. या कामाच्या दर्जाबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा देत बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर यांनी काम सुरू असलेल्या ठिकाणी जाऊन पाहणी केली.
‘‘नागरिकांना उत्तम पायाभूत सुविधा मिळणे हा आमचा मुख्य उद्देश आहे. या अनुषंगाने होत असलेली विकासकामे दर्जेदारच झाली पाहिजेत,’’ अशा सूचना बापर्डेकर यांनी संबंधित बांधकाम विभागाला दिल्या. कामात कुठल्याही प्रकारची त्रुटी राहू नये, हीच आमची भूमिका असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या पाहणी दौऱ्यात सभापती बापर्डेकर यांच्यासह नगरसेवक मंदार ओरसकर, पालिका कर्मचारी राजा केरीपाळे, बांधकाम विभागाचे कर्मचारी व कामगार उपस्थित होते. शहरातील अंतर्गत रस्ते आणि सांडपाणी नियोजनाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी पालिका कटिबद्ध असल्याचे यावेळी दिसून आले. लोकप्रतिनिधींनी कामाच्या ठिकाणी जाऊन पाहणी केल्यामुळे कामाला गती मिळेल आणि गुणवत्ता राखली जाईल, असा विश्वास स्थानिकांनी व्यक्त केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

