रत्नागिरी - संक्षिप्त
सहा टन कचऱ्याचे
गुहागरमध्ये संकलन
गुहागर ः गुहागर शहरात स्वच्छता अभियान डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठाने स्वच्छता अभियानात सुमारे सहा टन ओला व सुका कचरा संकलन केला. प्रतिष्ठानचे काम गौरवास्पद आहे, असे प्रतिपादन गुहागरचे पोलीस निरीक्षक सचिन सावंत यांनी केले. ते या स्वच्छता अभियानाच्या सांगता समारंभात बोलत होते. या अभियानांतर्गत गुहागर न्यायालय ते बाजारपेठ, श्री व्याघ्रंबरी देवस्थान वरचापाट ते महावितरण कार्यालय व सर्व शासकीय कार्यालयात हे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानात गुहागर तालुक्यातील पाच श्री सदस्य बैठकीतील सदस्य स्वच्छता मोहिमेत एकुण २२० श्री सदस्यांनी या अभियानात सव्वा टन ओला कचरा व साडेचार टन सुका कचरा गोळा करण्यात आला. हा कचरा नगरपंचायत डंपिंग ग्राऊंड येथे गोळा करून टाकण्यात आला. यामध्ये मुख्याधिकारी स्वप्निल चव्हाण, उपनगराध्यक्ष प्रदिप बेंडल, आरोग्य सभापती सजित साटले, बांधकाम सभापती उमेश भोसले, नगरसेवक समीर बागकर, सुधाकर कांबळे यांच्यासह पोलिस कर्मचारी सहभागी झाले होते.
-------
गुहागरचा महापुरुष संघ
क्रिकेट स्पर्धेत विजयी
गुहागर : महापुरुष सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळ, गुहागर यांच्या वतीने आयोजित ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धेत यजमान ‘महापुरुष’ संघाने अटीतटीच्या सामन्यात विजय मिळवत विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात स्वयंभू अंजनवेल संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. रत्नागिरी जिल्ह्यातील ३२ नामांकित संघांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. महापुरुष गुहागर आणि स्वयंभू अंजनवेल यांच्यात झालेला अंतिम सामना अत्यंत चुरशीचा ठरला. सामन्याच्या शेवटच्या चेंडूवर षटकार खेचत महापुरुष संघाने मानाचा चषक आपल्या नावावर केला. विजेत्या संघास २०,००० रुपये रोख व चषक, तर उपविजेत्या संघास १५,००० रुपये रोख व चषक देऊन गौरविण्यात आले. यामध्ये सामनावीर कुणाल देसाई, उत्कृष्ट फलंदाज सुजित बागकर, उत्कृष्ट गोलंदाज राकेश राऊत, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक प्रसाद बोले, मालिकावीर ऋतिक पारदी यांना वैयक्तिक पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. दरम्यान, बक्षीस वितरण समारंभाप्रसंगी बोलताना मंडळाचे अध्यक्ष संतोष गुहागरकर यांनी गुहागरमध्ये खेळाडूंची मोठी संख्या असल्याचे नमूद केले. शहरात एक सुसज्ज क्रीडा संकुल आणि क्रीडांगण उभारण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. या सोहळ्याला उपनगराध्यक्ष प्रदीप बेंडल, शिवसेना शहरप्रमुख निलेश मोरे, शामकांत खातू, संतोष वरंडे, भाऊ कानगुटकर उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

