बास्केटबॉल स्पर्धेत कोल्हापूरचे वर्चस्व

बास्केटबॉल स्पर्धेत कोल्हापूरचे वर्चस्व

Published on

बास्केटबॉल स्पर्धेत
कोल्हापूरचे वर्चस्व
चिपळूण : तालुक्यातील डेरवण येथे सुरू असलेल्या स्पर्धांमध्ये बास्केटबॉलमध्ये १६ वर्षीय मुलींमध्ये कोल्हापूरच्या वारणा क्लबने तर याच वयोगटातील मुलांमध्ये साताऱ्याच्या एन.बी. हुप्सने प्रथम क्रमांक मिळविला आहे. स्पर्धेमध्ये कोल्हापूरच्याच फ्लाय बास्केटबॉलमध्ये १६ वर्षीय मुलींमध्ये व मुलांमध्ये कोल्हापूरच्या घुणकी येथील छत्रपती शिवाजी हायस्कूलने द्वितीय क्रमांक मिळवला. १४ वर्षीय मुलींमध्ये पुणे येथील जेएसपीएम ब्लॉसम हायस्कूलने तर मुलांमध्ये साताऱ्याच्या एन.बी. हुप्सने प्रथम क्रमांक मिळवला तर याच १४ वर्षीय वयोगटातील साताऱ्याच्या एन.बी.हुप्सने मुलींमध्ये व मुलांमध्ये द्वितीय क्रमांक मिळवला आहे.

डीबीजे महाविद्यालयात
उद्या युवा संसद
चिपळूण ः भारत सरकारच्या युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालयाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ‘विकसित भारत राष्ट्रीय युवा संसद २०२६’ उपक्रमांतर्गत ५ मार्चला डीबीजे महाविद्यालयात युवा संसद आयोजित करण्यात आली आहे. ‘आणीबाणीची ५० वर्षे भारतीय लोकशाहीसाठी बोध’ या विषयावर ही स्पर्धा होणार असून १८ ते २५ वयोगटातील तरुणांना सहभागाची संधी देण्यात आली आहे. या स्पर्धेतून जिल्हास्तरावर निवड झालेल्या स्पर्धकांपैकी पाच जणांची निवड राज्यस्तरीय स्पर्धेसाठी केली जाणार आहे. त्यानंतर राज्यस्तरावरून तीन स्पर्धकांची राष्ट्रीय स्तरासाठी निवड होईल. राष्ट्रीय स्तरावरील अंतिम फेरीत निवड झालेल्या स्पर्धकांना लोकसभा संसद, नवी दिल्ली येथे आपले विचार मांडण्याची संधी मिळणार आहे. निवड प्रक्रियेत शिक्षणतज्ज्ञ, पत्रकार, स्थानिक लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी तसेच समाजातील प्रतिष्ठित सदस्य सहभागी होणार आहेत. कार्यक्रमाला नवकोंकण एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन मंगेश तांबे, सेक्रेटरी अतुल चितळे, प्राचार्य डॉ. माधव बापट, उपसंचालक अमित पुंडे आदी उपस्थित राहणार आहेत.

-rat३p१७.jpg-
२६O२८३००
सचिन पाकळे
---
शुभम पाकळेचे
सीए परीक्षेत यश
चिपळूण ः नागावे-सुकाईनगर येथील शुभम सचिन पाकळे याने सीए परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. २२व्यावर्षी पहिल्याच प्रयत्नात तो सीए परीक्षा उत्तीर्ण झाला आहे. आगवेकर माध्यमिक विद्यालय व सी. ए वसंत लाड कनिष्ठ महाविद्यालयात माध्यमिक शिक्षण पूर्ण करून त्याने डीबीजे महाविद्यालयात वाणिज्य पदवी शिक्षणासाठी प्रवेश घेतला. त्याचवेळी त्याने सीए होण्यासाठी कठोर मेहनत घेतली. शुभम याची आई नागावे गावातील महिला पोलिसपाटीलपदी कार्यरत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com