कसब्यातील प्राचीन मंदिरांनी घेतला मोकळा श्वास

कसब्यातील प्राचीन मंदिरांनी घेतला मोकळा श्वास

Published on

-rat३p१८.jpg-
P२६O२८३०१
संगमेश्वर ः कसबा येथील मंदिरांची साफसफाई करणारे दुर्गवीर.
-------
प्राचीन मंदिरांसाठी दुर्गवीरांचे श्रमदान
कसबा येथे सोमेश्वर, काशीविश्वेश्वर परिसर स्वच्छ
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. ३ ः महाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहासाचे साक्षीदार असलेल्या प्राचीन मंदिरांचे जतन आणि संवर्धन व्हावे, या उदात्त ध्येयाने दुर्गवीर प्रतिष्ठानने कसबा येथील सोमेश्वर आणि काशी विश्वेश्वर मंदिर परिसरात स्वच्छता व श्रमदान मोहीम यशस्वीरीत्या राबवली. त्यामुळे येथील मंदिरांनी झाडाझुडपांच्या विळख्यातून मोकळा श्वास घेतला.
स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराजांचा काळ ज्या गावाने पाहिला आणि त्यांच्या बलिदानाची साक्ष दिली, त्याच भूमीतील प्राचीन मंदिरे काळाच्या ओघात झाडाझुडपांच्या विळख्यात अडकली होती. या मंदिरांचे सौंदर्य पुन्हा उजळून निघावे आणि पर्यटकांनी या वारशाकडे आकर्षित व्हावे, यासाठी दुर्गवीर प्रतिष्ठान सातत्याने प्रयत्नशील असते. येथील मोहिमेची सुरुवात कसबा येथील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. त्यानंतर सर्व दुर्गवीर सोमेश्वर मंदिर परिसराकडे रवाना झाले. झाडाझुडूपांनी वेढलेली प्राचीन मंदिरे दुर्गवीरांनी स्वच्छ केली. मंदिराच्या छतावर आणि भिंतींवर वाढलेली झुडपे हटवण्यात आली.
काशीविश्वेश्वर मंदिराच्या बाजूचा सर्व पालापाचोळा साफ करण्यात आला. मोहिमेसाठी सतीश लिंगायत, नवनाथ शेट्ये, धनाजी बेंद्रे, संजय बावधने, धनाजी भांगे यांनी मोलाचे सहकार्य केले.
-------
चौकट
३१ दुर्गवीर
ही मोहीम दुर्गवीर प्रतिष्ठानचे उपखजिनदार प्रशांत डिंगणकर व रत्नागिरी जिल्हाध्यक्ष रोहित बालडे यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. या मोहिमेत निशांत जाखी, योगेश सावंत, प्रणव राक्षे, सार्थक डोलारे, दीप्ती साळवी, प्रतीक्षा बाईत, माही सावंत, ओंकार सावंत, सौरभ सावंत, स्वरूप नलावडे, राज मोहिरे, पराग लिंबूकर, यश राक्षे, राहुल रहाटे, प्रेम रहाटे, किरण सुर्वे, वंश पवार, दीपाली पवार, सिद्धी शेलार, सानिका विचारे, वेदांत लोकम, यश सावंत, साहिल मांजरेकर, भावेश सावंत, किशोर मोसमकर, पार्थ भोसले, आकाश शिर्के, किरण भुरवणे आणि शुभम मांजरेकर हे दुर्गवीर सहभागी झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com