सावंतवाडीत डास निर्मूलन मोहीम

सावंतवाडीत डास निर्मूलन मोहीम

Published on

28367

सावंतवाडीत डास निर्मूलन मोहीम

यंत्रणा सक्रिय; प्रभारी नगराध्यक्षांचा पुढाकार

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ३ : शहरात राबवलेल्या ‘महास्वच्छता’ अभियानाला यश मिळत असतानाच, आता प्रभारी नगराध्यक्ष अनिल निरवडेकर यांनी डास निर्मूलनाची धडक मोहीम हाती घेतली आहे.
शहरात डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने नागरिक त्रस्त होते. डास निर्मूलनासाठी फवारणी आणि फॉगिंग करावे, अशी मागणी कित्येक वर्षांपासून सातत्याने केली जात होती. भाजपने ही मागणी पूर्ण करण्याचे आश्वासन शहरवासीयांना दिले होते. या वचनाची पूर्तता करण्यासाठी प्रभारी नगराध्यक्ष निरवडेकर यांनी तत्काळ पावले उचलत संपूर्ण शहरात फॉगिंग मशीनद्वारे धूर फवारणी सुरू केली आहे.
शहरातील ज्या भागांमध्ये अस्वच्छता आहे किंवा जिथे डासांची उत्पत्ती होण्याची शक्यता अधिक आहे, अशा ठिकाणांवर या मोहिमेत विशेष लक्ष केंद्रित केले आहे. अत्याधुनिक फॉगिंग मशीनद्वारे औषध फवारणी केली जात आहे. ही मोहीम केवळ मुख्य रस्त्यांपुरती मर्यादित न राहता, शहरातील प्रत्येक कानाकोपऱ्यात राबवण्यात येणार असल्याचे निरवडेकर यांनी स्पष्ट केले. गेल्या अनेक वर्षांची मागणी अखेर मार्गी लागल्याने सावंतवाडीत आनंदाचे वातावरण आहे. प्रशासनाच्या या तत्परतेमुळे डेंगी, मलेरिया यांसारख्या आजारांवर नियंत्रण मिळवण्यास मदत होईल, असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com