मराठे महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन

मराठे महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन

Published on

-rat३p२६.jpg-
२६O२८३३४
राजापूर ः आबासाहेब मराठे महाविद्यालयात बोलताना आनंदीबाई रावराणे महाविद्यालयाचे रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ. ज्ञानेश्वर शिरसाट.
-------
मराठे महाविद्यालयात विज्ञान दिन
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. ३ ः जागतिक स्तरावर स्पर्धात्मक राष्ट्र म्हणून भारताचे स्वप्न पूर्ण करण्यात महिलांचा सहभाग महत्वाचा असेल, असे प्रतिपादन आनंदीबाई रावराणे महाविद्यालयाचे रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ. ज्ञानेश्वर सिरसट यांनी केले.
आबासाहेब मराठे महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील कृत्रिम बुद्धिमत्तेच्या संधी आणि संशोधन, भारतीय महिला शास्त्रज्ञांचे योगदान या विषयावरील भित्तिपत्रकाचे उद्‍घाटन करण्यात आले. हातिवले येथील आबासाहेब मराठे महाविद्यालयात रसायनशास्त्र, वनस्पतिशास्त्र आणि विज्ञान मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय विज्ञान दिनाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी डॉ. प्रा. अतुल भावे उपस्थित होते.

Marathi News Esakal
www.esakal.com